गोदापात्रात अंघोळीसाठी उतरल्याने आठ वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 04:57 PM2019-03-10T16:57:35+5:302019-03-10T17:00:36+5:30

गोदावरी नदीकाठावर येणाऱ्या नागरिकांना आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे, जेणेकरून पाण्यात बुडून मुले मृत्यूमुखी पडण्याच्या घटना टाळता, येतील असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Eight-year-old girl drowns after she leaves for bathing in the Godavari | गोदापात्रात अंघोळीसाठी उतरल्याने आठ वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू

गोदापात्रात अंघोळीसाठी उतरल्याने आठ वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देशाळकरी मुलांनी नदीपात्रात उतरणे टाळावे, अन्यथा कारवाई पाण्याच्या प्रवाहाचा वेग सध्या अधिक

नाशिक : आपल्या आईसोबत गंगाघाटावर आलेल्या आठवर्षीय बालिकेचा गौरी पटांगणाजवळ नदीपात्रात पडून नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, निलिगरी बाग येथे राहणारी पूजा ही शुक्र वारी (दि.८) रोजी दुपारी गंगाघाटावर आई समवेत आली होती. त्यावेळी ती गौरी पटांगणजवळ असलेल्या नदीपात्रात तोल जाऊन पाण्यात पडली. त्यामुळे पुजाच्या नाकातोंडात पाणी गेले. तीला तत्काळ उपचारार्थ तिच्या भावाने जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (दि.९) दुपारी तीची प्राणज्योत मालवली. नदीपात्रात पूजा अंघोळ करण्यासाठी उतरली असल्याचे समजते; मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज तिला आला नाही तसेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग सध्या अधिक असल्यामुळे ती पाण्यात बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोदावरी नदीकाठावर येणाऱ्या नागरिकांना आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे, जेणेकरून पाण्यात बुडून मुले मृत्यूमुखी पडण्याच्या घटना टाळता, येतील असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शाळकरी मुलांनी गोदाकाठावर विनाकारण भटकंती करत नदीपात्रात उतरणे टाळावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Eight-year-old girl drowns after she leaves for bathing in the Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.