अपुºया बसेसमुळे तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:40 AM2018-09-21T00:40:28+5:302018-09-21T00:41:14+5:30

देसराणे : तालुक्यातील रवळजी, देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी ९ ते ९.३० वाजता कळवण आगाराने नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी तसेच शिवसेना युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी व शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले.

Due to the exceptional buses, | अपुºया बसेसमुळे तारांबळ

अपुºया बसेसमुळे तारांबळ

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी व शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले.

देसराणे : तालुक्यातील रवळजी, देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी ९ ते ९.३० वाजता कळवण आगाराने नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी तसेच शिवसेना युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी व शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कळवणहून सकाळी आठ वाजता बस थेट जयदरपर्यंत जाते; मात्र जयदरपासून खेड्यांमधून प्रवासी, शालेय विद्यार्थी यांनी ही बस भरून येते. परिणामी नाळीद, इन्शी, देसराणे, रवळजी या गावांना ही बस थांबत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी, प्रवाशांना याची झळ बसत असते. शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत कळवणला पोहोचता येत नाही. अनेकवेळा तक्रारी करूनदेखील कळवण आगारप्रमुख याकडे दुर्लक्ष करीत आहे. कळवण, देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी आठ वाजता बस असून, त्यानंतर थेट अकरा वाजताच बस उपलब्ध आहे.
त्यामुळे प्रवासी नागरिकांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. संतप्त प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी अनेक वेळा देसराणे येथे आंदोलन केले होते. आगाराने कळवण ते देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी नऊ वाजता नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी, प्रवासी नागरिकांनी केली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, विधानसभा संघटक दशरथ बच्छाव, विधानसभा सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, कक्ष शहरप्रमुख किशोर पवार, युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, विधानसभा संघटक संभाजी पवार व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Due to the exceptional buses,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.