लगबग : वाळवणाचे पदार्थ केवळ देशपातळीवरच नाही, तर जगभरात पाठवले जात आहेत उन्हाळी वाळवणामुळे महिलांना मिळतेय रोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:26 AM2018-05-09T00:26:56+5:302018-05-09T00:26:56+5:30

नाशिक : कडक ऊन म्हटले की जिवाची लाहीलाही होते. उन्हाळा नकोसा वाटतो. पण याच कडक उन्हाचा उपयोग करून घेत वर्षभराची बेगमी अर्थात वाळवणाचे पदार्थ करण्यावर.

Dry: Dry foods are not only available on the countryside, but are also being sent around the world. | लगबग : वाळवणाचे पदार्थ केवळ देशपातळीवरच नाही, तर जगभरात पाठवले जात आहेत उन्हाळी वाळवणामुळे महिलांना मिळतेय रोजगाराची संधी

लगबग : वाळवणाचे पदार्थ केवळ देशपातळीवरच नाही, तर जगभरात पाठवले जात आहेत उन्हाळी वाळवणामुळे महिलांना मिळतेय रोजगाराची संधी

googlenewsNext
ठळक मुद्देतयार वाळवणाचे पदार्थ करून घेण्यावर भर महिलांना त्याद्वारे चांगला रोजगार मिळत आहे

नाशिक : कडक ऊन म्हटले की जिवाची लाहीलाही होते. उन्हाळा नकोसा वाटतो. पण याच कडक उन्हाचा उपयोग करून घेत वर्षभराची बेगमी अर्थात वाळवणाचे पदार्थ करण्यावर, त्यांच्याद्वारे दोन पैसे कमवण्यावर सध्या महिला भर देत आहेत. वैयक्तिक स्वरूपाबरोबरच बचतगटांद्वारेही महिला वडे, पापड आदी असंख्य प्रकारच्या वाळवणाच्या पदार्थांची निर्मिती करत नोकरदार, कामकाजी महिलांची गरज पूर्ण करत आहेत. हे वाळवणाचे पदार्थ केवळ देशपातळीवरच नाही, तर जगभरात विविध भागातही पाठवले जात असून, उद्यमशील महिलांना त्याद्वारे चांगला रोजगार मिळत आहे.
सध्या नोकरदार तसेच अनेक गृहिणीही तयार वाळवणाचे पदार्थ करून घेण्यावर भर देत आहेत. हे वाळवणाचे पदार्थ किलो, शेकडा किंवा मेहनताना आदी स्वरूपात करून घेतले जात आहेत. शहरातील २० ते २५ हजार महिलांना यातून रोजगार मिळत असून, खर्च वजा जाता पाच ते पंधरा हजार रुपयांचा नफा हाती पडत आहे. वर्षभर लहानमोठ्या सणांना आणि पाहुणे आल्यानंतर त्यांच्या ताटात इतर पदार्थांबरोबरच चार वाळवणाचे पदार्थ छान तळून, भाजून वाढले की गृहिणीला आणि खाणाऱ्यांनाही समाधान वाटते. उन्हाळा सुरू झाला की वाळवणाच्या पदार्थांची लगबग सुरू होते. मात्र आजकाल सुट्यांचा अभाव, मदतीला हाताशी कुणी नसणे, घरातील मोठ्या मार्गदर्शकांची कमतरता, वाढते ऊन, जागेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लोक घरी करत बसण्यापेक्षा हे पदार्थ विकत घेण्यावर भर देऊ लागले आहेत. त्यात खात्रीशीरपणे सहजतेने उपलब्ध होत असलेले घरगुती वाळवणाचे पदार्थ, मशीनवरही लवकर तयार करून मिळण्याची सोय यामुळे झाली आहे. उडदाचे पापड, शेवया, वेफर्स आदी बनवण्यासाठी मशीनही उपलब्ध होत आहेत. दुकानदारांना घाऊक विक्री, यंत्रांच्या साहाय्याने वाळवणाचे पदार्थ करून देणे आणि घरगुती स्वरूपात पदार्थ तयार करून ते विकणे आदी प्रकारे महिलांना रोजगार मिळत आहे. नागली पापड- १८० रुपये किलो, तांदूळ पापड- १६० रुपये किलो, ज्वारी पापड- १७० रुपये किलो, बटाटा पापड- १८० रुपये किलो, पोहा पापड- २०० रुपये किलो, उडिद- २०० रुपये किलो, मद्रास पापड- २०० रुपये किलो, नागली डिस्को पापड- १२० रुपये किलो, शेवया- १४० रुपये किलो, कुरडया- २६० रुपये किलो, वेफर्स- १५० रुपये किलो, चकली- २४० रुपये किलो या दरात मिळत आहे. शेकडा दराने घ्यायचे असल्यास हे पदार्थ उडदाचे पापड- २६० रुपये शेकडा, बटाटा पापड- ३०० रुपये शेकडा, नागली पापड- ३५० रुपये शेकडा, चकली- ३०० रुपये शेकडा, कुरडया- ३५० रुपये शेकडा, तर हातशेवया ३५० रुपये किलो या दराने मिळत आहेत.

Web Title: Dry: Dry foods are not only available on the countryside, but are also being sent around the world.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा