सिडकोत नैसर्गिक नाल्यातील ड्रेनेज पाइप फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:24 AM2018-06-05T00:24:28+5:302018-06-05T00:24:28+5:30

येथील प्रभाग क्रमांक २८ मधील नागेश्वर महादेव मंदिर साळुंखेनगर येथील नाल्यामधून गेलेल्या ड्रेनेजलाइनचा पाइप फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेस कळवूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 Drainage pipe split into natural gutter in Cidkot | सिडकोत नैसर्गिक नाल्यातील ड्रेनेज पाइप फुटला

सिडकोत नैसर्गिक नाल्यातील ड्रेनेज पाइप फुटला

Next

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २८ मधील नागेश्वर महादेव मंदिर साळुंखेनगर येथील नाल्यामधून गेलेल्या ड्रेनेजलाइनचा पाइप फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेस कळवूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  महापालिकेच्या वतीने दरवर्षी सिडकोच्या मध्यवस्तीतून जात असलेल्या नसर्गिक नाल्यांमधील घाण व कचरा साफसफाई करण्याची मोहीम राबविण्यात येते. नैसर्गिक नाले हे उघडे असल्याने व यात घाण आणि कचरा साचत असल्याने त्यांची कायम साफसफाई करण्याची गरज असताना महापालिकेच्या वतीने केवळ पावसाळ्याच्या काळातच ही साफसफाई केली जाते. या नाल्यामध्ये साचणाऱ्या घाण व कचºयामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सिडकोसह शहरातील उघड्या नाल्यांमुळे होणारी अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे नाले बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमांतर्गत आयुक्तांकडे करण्यात आली होती; परंतु नाले बंदिस्त अथवा त्यावर काँक्रिटीकरण केले जाणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच उघड्या नाल्यांमधील घाण व कचरा साफ करण्याची जबाबदारी ही मनपाची असल्याचेही आयुक्तांनी नागरिकांना सांगितले. असे असतानाही प्रभाग क्रमांक २८ मधील वावरेनगर महादेव मंदिर परिसरातून जाणा-या नैसर्गिक उघड्या नाल्यामधून गेलेल्या ड्रेनेजलाइनचा पाइन गेल्या दहा दिवसांपासून फुटला असल्याने नाल्याच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी प्रभाग नगरेसवक सुवर्णा मटाले यांना सांगितले. मटाले यांनीही नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने सदरचे काम मनपा प्रशासनाने तातडीने करावे असे सांगूनही प्रशासनाकडून मात्र दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title:  Drainage pipe split into natural gutter in Cidkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.