प्रभाग ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:33 AM2018-12-26T00:33:39+5:302018-12-26T00:34:07+5:30

महापालिकेच्या हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेºयाच्या नजरेखाली आला आहे.

Division of 30 CCTV Cameras | प्रभाग ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत

प्रभाग ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत

Next

इंदिरानगर : महापालिकेच्या हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेºयाच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील प्रत्येक चौकात युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ३६ कॅमेºयांची प्रभागावर सूक्ष्म नजर असणार आहे. मंगळवारी वैभव कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेºयाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदिरानगर परिसरात होणाºया घरफोड्या, सोनसाखळी चोरी आणि टवाळखोरीसह गुन्हेगारीस आळा बसण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक सतीश सोनवणे यांनी प्रभाग सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आल्याने ९५ टक्के प्रभाग सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे. अनेक वेळेस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची मदत झाली आहे. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल जगताप, उपनिरीक्षक मोरे, अनिकेत सोनवणे, अनिल जाचक यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर शिरसाठ यांनी केले.
यापूर्वी इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. परंतु अनेकदा तांत्रिक कारणामुळे अडचणी आल्याने नागरिकांकडून नाराजीदेखील व्यक्त करण्यात आली होती. आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे परिसरावर लक्ष राहणार असल्याने घरफोडी, सोनसाखळी चोरी यासारख्या गुन्हेगारीला आळा बसेल असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
...या चौकात बसविले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे
भगवती चौक, राणेनगर चौफुली, लालबाग चौक, पांडव नगरी, कैलासनगर बसथांबा, कमोदनगर, चार्वाक चौक, राजीव टाउनशिप, नगरसेवक संपर्क कार्यालय परिसर याभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महापालिका निवडणुकीत प्रभाग भयमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन टप्प्याटप्प्याने चौकाचौकात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसून पूर्ण करीत आहे. सीसीटीव्ही कॅमेºयामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्यास मदतच झाली असून, गुन्हेगारीस आळा बसला आहे.
- सतीश सोनवणे,  नगरसेवक

Web Title: Division of 30 CCTV Cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.