जिल्हापरिषदेच्या शाळेला पिंपळगाव येथे लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 05:47 PM2019-03-12T17:47:44+5:302019-03-12T17:49:34+5:30

पिंपळगांव बसवंत : शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गेल्या वर्ष भरापासून खराब बेंचेस असलेल्या एका बंद खोलीस सोमवारी (दि.११) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची घटना घडली, यात शाळेचे बेंचेस, वह्या जळून खाक झाले.

The district council school took fire in Pimpalgaon | जिल्हापरिषदेच्या शाळेला पिंपळगाव येथे लागली आग

जिल्हापरिषदेच्या शाळेला पिंपळगाव येथे लागली आग

googlenewsNext
ठळक मुद्देअग्नीशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

पिंपळगांव बसवंत : शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गेल्या वर्ष भरापासून खराब बेंचेस असलेल्या एका बंद खोलीस सोमवारी (दि.११) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची घटना घडली, यात शाळेचे बेंचेस, वह्या जळून खाक झाले.
पिंपळगांव अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेतील कोपऱ्यात असलेल्या बंद खोलीस आग लागल्याची माहिती अग्नीशमन विभागास मिळाली असता अग्नीशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
शॉक सर्कीटमुळे लागलेल्या या आगीत मात्र वर्ष भरापासून बंद असलेल्या खोलीतील लाकडी बेंचेस वह्या, खोलीचे दरवाजे, खिडक्या छतावरील पत्र्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
 

Web Title: The district council school took fire in Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा