जिल्हा बॅँक : वसुलीसाठी कठोर पावले उचलणार संचालकांनी केली कामकाजाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:54 AM2018-02-09T01:54:42+5:302018-02-09T01:56:43+5:30

नाशिक : उच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी गुरुवारच्या मुहूर्तावर बॅँकेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात केली.

District Bank: Directing the work done by the directors to take stringent measures for recovery | जिल्हा बॅँक : वसुलीसाठी कठोर पावले उचलणार संचालकांनी केली कामकाजाला सुरुवात

जिल्हा बॅँक : वसुलीसाठी कठोर पावले उचलणार संचालकांनी केली कामकाजाला सुरुवात

Next
ठळक मुद्देकारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धावन्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर

नाशिक : उच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी गुरुवारच्या मुहूर्तावर बॅँकेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात केली. बॅँकेचे अध्यक्ष म्हणून सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसांतच बरखास्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने अध्यक्षपदाच्या खुर्चीला अपशकुनी ठरवून अध्यक्ष केदा अहेर यांनी यावेळी जुनी खुर्ची दालनाबाहेर काढून नवीन खुर्चीवर बसत नव्या ‘इनिंग’ला प्रारंभ केला. रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर २९ डिसेंबर रोजी बरखास्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. संचालकांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी होऊन न्यायालयाने सहकार खात्याच्या बॅँक बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती देत संचालकांना बॅँकेचे नियमित कामकाजात सहभागी होण्याची मुभा दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या संचालकांना बुधवारी सायंकाळी आदेशाची प्रत मिळाल्यावर गुरुवारी दुपारी दोन वाजता अध्यक्ष केदा अहेर, उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्यासह संचालकांनी जिल्हा बॅँकेत प्रवेश केला. यावेळी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर करून केदा अहेर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आमदार सीमा हिरे, डॉ. शोभा बच्छाव, शिरीष कोतवाल, परवेज कोकणी, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, संदीप गुळवे, किशोर दराडे, धनंजय पवार हे संचालक उपस्थित होते. संचालकांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच बॅँकेचे शाखाधिकारी, खातेप्रमुखांची बैठकही घेण्यात आली व त्यात बॅँकेच्या वसुलीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.
वसुलीसाठी कठोर प्रयत्न
यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना अध्यक्ष केदा अहेर यांनी बॅँकेच्या कामकाजात सर्व घटकांना बरोबर घेऊन कामकाज करण्यात येईल, असे सांगितले. शेतकºयांची बॅँक असल्याने कोणतेही चुकीचे कामकाज होणार नाही व कोणाला करूही दिले जाणार नाही, बॅँकेविषयीचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्व संचालक एकत्रितपणे प्रयत्न करतील त्याचबरोबर कोणत्याही संचालकांकडे बॅँकेची थकबाकी नाही, मात्र ज्यांच्याकडे थकीत कर्ज आहे ते वसुलीसाठी प्रसंगी कठोर पावले उचलली जातील व बॅँकेला अडचणीतून बाहेर काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

Web Title: District Bank: Directing the work done by the directors to take stringent measures for recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक