जिल्हा प्रशासनाने दडपशाही थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:34 AM2017-10-31T01:34:39+5:302017-10-31T01:34:45+5:30

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.

The district administration should stop the oppression | जिल्हा प्रशासनाने दडपशाही थांबवावी

जिल्हा प्रशासनाने दडपशाही थांबवावी

Next

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.  राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (दि.३०) जनता दरबार घेण्यात आला. यावेळी एका शेतकºयाने कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना धारेवर धरले. व्यापाºयांना जिल्हाधिकाºयांनी दालनात बोलावून बैठक घेत कांद्याचे दर शेतकºयांना वाढवून द्यावयाचे नाही, अशी तंबी दिल्याचा आरोप यावेळी त्या शेतकºयाने केला. जिल्हधिकाºयांनी दडपशाही थांबवावी आणि जिल्ह्णातील कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, राधाकृष्णन् यांनी शेतकºयाचा आरोप बिनबुडाचा असून, जिल्हा प्रशासनाने व्यापाºयांच्या बैठकीत केवळ शेतकरी हित लक्षात घेत व्यापाºयांनी कांद्याची साठेबाजी न करता दिवाळीचा कालावधी लक्षात घेऊन योग्य हमीभावाने कांदा खरेदी करून जिल्ह्णाबाहेर काढावा, अशा सूचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. दिवाळीमध्ये कुठल्याही कारणास्तव कांदा बाजार व्यापाºयांनी बंद ठेवू नये, असाही आदेश यावेळी बैठकीत व्यापाºयांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकºयांकडून कांद्याचा माल अगोदर खरेदी करून त्याची साठेबाजी करत नंतर दरवाढ करून नये, असे प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आले होते. त्यामुळे केवळ गैरसमजापोटी दडपशाहीचा आरोप करणे चुकीच असल्याचे त्यांनी यावेळी बाजू मांडताना पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. 
...तर परवाने रद्द करू
च्दिवाळीच्या हंगामात कांद्याची साठेबाजी करत जिल्हाबाहेर कांदा न पाठविणाºया व नंतर दरवाढ करणाºया व्यापाºयांचे जिल्हास्तरावरील परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हधिकाºयांनी जनता दरबारामध्ये दिली. एकूणच जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या हित लक्षात घेऊन योग्य त्या सूचना देत कार्यवाही केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे व्यापाºयांच्या बाजूने कोणतेही धोरण नव्हते.
धनश्री अहेरांचे पालकमंत्र्यांना साकडे
महाराष्टÑ राज्य महावितरण कंपनीने कृषिपंपांचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य धनश्री अहेर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. जिल्ह्णामध्ये महावितरण कंपनीने वीज देयक न भरल्यामुळे अनेक शेतकºयांच्या कृषिपंपांचा विद्युत पुरवठा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देताच खंडित केला आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकºयांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

Web Title: The district administration should stop the oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.