शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:26 AM2018-03-16T01:26:06+5:302018-03-16T01:26:06+5:30

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसांत तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.

Disapproved online insertion for scholarship | शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह सोडला

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह सोडला

Next
ठळक मुद्देदोन दिवसांची मुदतसमाजकल्याण विभागाकडून आॅफलाइन अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसांत तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नूतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाइन अर्ज भरण्याच्या सूचना यापूर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या होत्या, परंतु सहायक आयुक्त कार्यालयाकडे बहुतांशी महाविद्यालयांनी फक्त नूतनीकरणाचेच अर्ज दाखल केले आहेत. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन नूतनीकरणाचे आॅफलाइन अर्ज काही महाविद्यालयांनी सादर केले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांनी १६ मार्चपूर्वी नवीन व नूतनीकरणाचे आॅफलाइन अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावेत, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त प्राची वाजे यांनी केले आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत.
सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेंतर्गत लाभ अदा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती शासनाने जानेवारीत काढलेल्या आदेशात नमूद असून, त्यानुसार विजाभज, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या केंद्र व राज्य योजनांमधील शंभर टक्के निधी विद्यार्थ्यांना मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. जानेवारीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे नूतनीकरण अर्ज आॅनलाइन प्रणालीद्वारे त्या त्या महाविद्यालयांनी आॅनलाइन पद्धतीने आणि सन २०१७-१८ मधील नवीन आॅफलाइन अर्ज विहित नमुन्यात अचूक माहितीसह सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार १६ मार्चपूर्वी महाविद्यालयांनी सदरचे अर्ज सादर करावेत त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही वाजे यांनी म्हटले आहे.महाविद्यालयांवर जबाबदारीसामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनेनुसार कोणीही विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. जर कोणी विद्यार्थी शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहिल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची राहील, असा इशाराही प्राची वाजे यांनी दिला आहे.

Web Title: Disapproved online insertion for scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.