आठवडाभरात डेेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:30 AM2018-10-23T01:30:11+5:302018-10-23T01:30:45+5:30

शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. आठवडाभरात शहरात डेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रोगराई कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.

 Dengue 24, Swine Flu 26 patients in the week | आठवडाभरात डेेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण

आठवडाभरात डेेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण

Next

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. आठवडाभरात शहरात डेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रोगराई कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईचे थैमान सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसांत स्वाइन फ्लूमुळे सहा जणांचा बळी गेला, तर एकूण बळींची संख्या ५७ वर गेली. डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहाशेच्या घरात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या महापालिकेत फक्त प्रशासनच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करते असे भासवले जात असले तरी रोगराई थांबवतांना तसे दिसत नाही. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने नगरसेवक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत त्यावरून प्रशासनावर रोष व्यक्त झाला. इतकेच नव्हे आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापौर रंजना भानसी यांनी चांगलेच सुनावले आणि रोगराईस जबाबदार ठरवत कृती न केल्यास कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, यानंतरदेखील परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. महापालिकेच्याच आकडेवारीनुसार १५ ते २२ आॅक्टोबर दरम्यान २४ डेंग्यूचे, तर २६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, तर एक महिन्याचा विचार केला तर महिनाभरात डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत ६३० डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचे आॅक्टोबर महिन्याच्या २२ दिवसांतच ७१ रुग्ण आढळले आहेत, तर जानेवारीपासून आत्तापर्यंत २२६ रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत डेंग्यूचा एक रुग्ण दगावला आहे. मात्र घरटी रुग्ण असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.  डेंग्यू आणि स्वाइन फ्लूमुळे अजूनही अनेक रुग्णालये हाउस फुल आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमधील गर्दी कमी झालेली नाही. महापालिकेकडून उपाययोजनेऐवजी फक्त जनजागृतीवर भर दिला जात असून, तो फार प्रभावी नसल्याचे दिसत आहे. दिवाळी तोंडावर आली असताना शहरातील रोगराई थांबत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Web Title:  Dengue 24, Swine Flu 26 patients in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.