भारतीय  कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:08 AM2018-08-21T01:08:49+5:302018-08-21T01:09:27+5:30

दिल्लीत जंतरमंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

 Demands from the Communist Party of India | भारतीय  कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने

भारतीय  कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने

Next

नाशिकरोड : दिल्लीत जंतरमंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करून निवेदन देण्यात आले.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिल्ली जंतरमंतर येथे संविधानाची प्रत जाळणाºया समाजकंटकांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी विभागीय उपायुक्त दिलीप स्वामी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनाशी संबंधित आरोपींची चौकशी करण्यात यावी.  निवेदनावर राजू देसले, महादेव खुडे, अ‍ॅड. राजपालसिंग शिंदे, प्रताप भालके, व्ही. डी. धनवटे, ज्योती नटराजन, शिवनाथ जाधव, सुभाष गवारे, नामदेव बोराडे, नितीन शिराळ आदींच्या सह्या आहेत. एससी एसटी, ओबीसी अ‍ॅन्ड मायनॉरिटीज एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनेही देण्यात आलेल्या निवेदनात संविधान जाळणाºया समाजकंटकांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Demands from the Communist Party of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.