कळवण तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:10 PM2018-10-15T18:10:07+5:302018-10-15T18:10:22+5:30

गावित यांचा दौरा : पावसाअभावी पिकस्थिती गंभीर

The demand for declaration of Kalwan taluka as drought | कळवण तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

कळवण तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देतालुक्यात पावसाळा संपला तरी सरासरीच्या केवळ ५० टक्केपेक्षा कमी प्रमाण असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे

पाळे खुर्द : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यामध्ये कळवण या आदिवासी तालुक्याचा शासनाने समावेश न केल्याने कळवण तालुक्यातील जनतेत व आदिवासी बाधवामध्ये नाराजी असून पाऊस उशिरा झाल्याने पिक येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कळवणचा समावेश करावा, अशी मागणी आमदार जे.पी. गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार जे. पी. गावित यांनी कळवण तालुक्यातील विविध गावांतील जाऊन पिकाची पाहणी केली. यावेळी पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तालुक्यात पावसाळा संपला तरी सरासरीच्या केवळ ५० टक्केपेक्षा कमी प्रमाण असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी बंधारे कोरडे असून पावसाच्या भरवशावर केलेला हंगाम वाया गेला आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांनी पिके जागविण्याचे आटोकाट प्रयत्न केला मात्र परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने पिके करपून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. भांडवल खर्च वाया गेला आहे. जनावरे आणि माणसांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील शेतजमिनी धोक्यात आल्या असून शेतकºयांना या संकटातून सावरता यावे तसेच कळवण महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून आणेवारी करावी, कळवण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आमदार जे. पी. गावित यांनी दुष्काळी पाहणी दरम्यान सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड, माकप सेक्रेटरी हेमंत पाटील, टिनू पगार, मोहन जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, नाना देवरे, अजय पगार आदी शेतकरी आदी उपस्थित होते,
 

Web Title: The demand for declaration of Kalwan taluka as drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.