कॅरिबॅग कारवाई करताना अधिकाऱ्यांशी अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:09 AM2019-01-18T01:09:03+5:302019-01-18T01:09:57+5:30

जेलरोड येथे प्लॅस्टिकची कॅरिबॅगचा वापर करणाºयांवर कारवाई करताना मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक यांची गाडी अडवून अरेरावीची केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Defeat with officials while taking action in Caribbe | कॅरिबॅग कारवाई करताना अधिकाऱ्यांशी अरेरावी

कॅरिबॅग कारवाई करताना अधिकाऱ्यांशी अरेरावी

Next

नाशिकरोड : जेलरोड येथे प्लॅस्टिकची कॅरिबॅगचा वापर करणाºयांवर कारवाई करताना मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक यांची गाडी अडवून अरेरावीची केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय रामगीर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जेलरोड इंगळेनगर चौफुलीजवळ एका शॉपमध्ये प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणारे मालक मन्सूर दिलावर शेख यांच्यावर कारवाई करीत असताना फिरोज अब्दुल करीम शेख रा. सातभाईनगर दसक जेलरोड व दिलावर अब्दुल करीम शेख रा. दसक जेलरोड यांनी अरेरावीची भाषा करून कॉलर पकडून ओळखपत्र ओढले. तसेच धक्काबुक्की करत शासकीय वाहन अडविले. दुकानातून घेतलेल्या वस्तू परत करा असे म्हणून मनपाच्या नावाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Defeat with officials while taking action in Caribbe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.