नाशिकमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:09 PM2019-04-14T18:09:44+5:302019-04-14T18:12:57+5:30

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नाशिक जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सर्व उमेदवारांकडून रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

Decision-makers will be unemployed in Nashik | नाशिकमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक

नाशिकमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक

Next
ठळक मुद्देगुंतवणुकी अभावी रोजगारात घट दोन लाखाहून अधिक तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत बेरोजगार तरुणांचा कौल ठरणार महत्वाचा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नाशिक जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सर्व उमेदवारांकडून रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. 
नाशिक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे रोजगारासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुणांनी नावनोंदणी केलेली आहे. यात ३९ हजार २८९ विविध शाखांच्या पदवीधर तरुणांचाही समावेश आहे.  विशेष म्हणजे यात नियमित नूतनीकरण करणाºया तरुणांचाच समावेश आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांचा आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.  आजवर सत्तेत येणाºया प्रत्येक सरकारसमोर देशातील बेरोजगारी सर्वाधिक डोकेदुखी आणि कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकांमध्ये रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असून, रोजगार निर्मितीच्या मुद्द्यांवर प्रत्येक निवडणुकीत राजकारण होताना प्रकर्षाने दिसून येते. परंतु, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती होत नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढली नसून अस्तित्वात असलेल्या उद्योगांचाही विस्तार झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊ शकलेली नसल्याने बेरोजगार तरुणांच्या नाशिक जिल्ह्यातही बेरोजगार तरुणांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. 

गुंतवणुक नसल्याने रोजगारात घट 
नाशिक रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात रोजगारासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यातील १५ ते ५० वयोगटातील २ लाख ३१ हजार ५६४ बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक होत नसल्याने आणि उद्योगांचा विस्तार होत नसल्याने उद्योगांसह विविध अस्तापणांच्या कार्यालयांकडून मनुष्यबळाची मागणी होत नसल्याने रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांची संख्या वाढत आहे.

Web Title: Decision-makers will be unemployed in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.