अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्तला वर्गजिल्हाधिकाºयांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:02 AM2017-12-05T00:02:05+5:302017-12-05T00:07:27+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्त शिवार अभियानाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ कोटींच्या कृती आराखड्यास धक्का बसला आहे.

Decision on the amount of 25 crores funded by district collector | अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्तला वर्गजिल्हाधिकाºयांचा निर्णय

अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्तला वर्गजिल्हाधिकाºयांचा निर्णय

Next
ठळक मुद्देअडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्तला वर्गजिल्हाधिकाºयांचा निर्णयजिल्हा परिषदेच्या १३ कोटींच्या कृती आराखड्यास धक्का

नाशिक : जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्त शिवार अभियानाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ कोटींच्या कृती आराखड्यास धक्का बसला
आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षच्या कामांना विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले असल्याने जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने सहा कोेटी ९९ लाखांचा अतिरिक्त कामांच्या आराखड्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. जिल्हा परिषदेला आदिवासी उपयोजनेंतर्गत २७०२ लेखाशिर्षखाली १४ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यातील मागील कामांचे सुमारे नऊ कोेटींचे दायित्व वजा जाता जिल्हा परिषदेला पाच कोटींचा निधी नियोजनासाठी उपलब्ध होता. मात्र त्यातील अडीच कोटींचा निधी आता जिल्हाधिकाºयांनी जलयुक्त शिवार अभियानातील जलसंधारणाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी वर्ग केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला आता उर्वरित अडीच कोटी रुपये निधीच्या दीडपट म्हणजेच पावणे चार कोटी रुपयांचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेचा प्रस्तावित आराखडा तेरा कोेटींचा असल्याने उर्वरित नऊ कोटींची कामे नेमकी कोणाची वगळली जाणार, याबाबत आता सदस्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

 

Web Title: Decision on the amount of 25 crores funded by district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.