पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:42 PM2018-05-28T17:42:31+5:302018-05-28T17:42:31+5:30

The death of a young man falling from the pedestrian | पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू

पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू

Next

इंदिरानगर/नाशिक - पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथे येणारे पर्यटक आणि ट्रेकिंग करणारे संरक्षण कठडे अभावी घसरून पडल्याच्या घटना वाढतच चालल्या असून याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महिन्याभरापूर्वी पांडवलेणी येथे ट्रेकिंगला गेलेल्या युवक, युवतीस पोलिसांच्या शिघ्र कृती दलाने वाचविल्याची घटना ताजी असतानाच अक्षय संजय रामकिशोर (२१) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्र वारी (दि. २५) पांडवलेणे येथे गेला असता तेथे खडकावरून पाय घसरून तो पडला. त्याच्या डोक्यास मार लागला आणि उजव्या मांडीचे हाड मोडले होते. त्यास तात्काळ खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी अक्षय यांची प्राणज्योत मालवली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The death of a young man falling from the pedestrian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.