जिल्हा रुग्णालयात दोघा ‘स्वाइन फ्लू’ संशयितांचा मृत्यू

By Admin | Published: August 30, 2015 10:31 PM2015-08-30T22:31:04+5:302015-08-30T22:33:06+5:30

अहवाल अजूनही प्रलंबित : आॅगस्ट महिन्यामध्ये सात जणांचा मृत्यू

Death of two swine flu suspects in district hospital | जिल्हा रुग्णालयात दोघा ‘स्वाइन फ्लू’ संशयितांचा मृत्यू

जिल्हा रुग्णालयात दोघा ‘स्वाइन फ्लू’ संशयितांचा मृत्यू

googlenewsNext

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या शहरातील एका महिलेसह सिन्नर तालुक्यातील एका स्वाइन फ्लू संशयित इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ या दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अद्यापही हे अहवाल प्राप्त झालेले नाहीत़ आॅगस्टमध्ये आतापर्यंत सात स्वाइन फ्लू संशयितांचा मृत्यू झाला आहे.
पंचशीलनगरमध्ये राहणाऱ्या सुमन दगू सोळसे (५३) या महिलेवर जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू होते़ त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोडी येथील राजेंद्र शिवराम शिंदे (३५) यांचा रविवारी मृत्यू झाला़ या दोघांमध्येही स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना या कक्षात दाखल करण्यात आले होते़

Web Title: Death of two swine flu suspects in district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.