नोंदणीची आज शेवटची मुदत

By admin | Published: June 17, 2017 01:01 AM2017-06-17T01:01:45+5:302017-06-17T01:01:54+5:30

नशिक : विभागातून अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (दि.१६) सुमारे १४ हजार ६१४ अर्ज निश्चित झाले आहेत

Deadline for registration today | नोंदणीची आज शेवटची मुदत

नोंदणीची आज शेवटची मुदत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नशिक : विभागातून अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (दि.१६) सुमारे १४ हजार ६१४ अर्ज निश्चित झाले असून, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी ९ हजार ३१८ अर्ज निश्चित झाले आहेत. तर हॉटेल व्यवस्थापन प्रवेशासाठी ११०व स्थापत्यशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी ४४३ अर्ज निश्चित झाले आहेत. तंत्रशिक्षण पदवी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी करणाऱ्यांसह कागदपत्रांची पडताळणी व अर्जात दुरुस्ती करण्याची शनिवारी (दि.१७) अखेरची मुदत असल्याने अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची विविध सुविधा कें द्रावर अर्ज भरण्यासाठी रीघ लागणार आहे.
आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नाशिकसह विभागातून अभियांत्रिकीचे (४६), औषधनिर्माणशास्त्राचे (३५), हॉटेल व्यवस्थापन (२) व स्थापत्य शास्त्र (५) सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या सूचनेनुसार पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येत असून, या प्रक्रियेतून संस्थास्तरावरील प्रवेशासाठी उपलब्ध जागांवर प्रवेशासाठी संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांनी सोमवारपासूनच (दि.५) सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रांवर (फॅसिलिशन सेंटर) अर्ज निश्चत व प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज निश्चित करून प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणीही करून घेतली आहे. अर्ज निश्चित करून प्रमाणपत्रांची पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचेच नाव सक्षम प्राधिकारी यांनी तयार केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यंदा अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र वैद्यकीय व दंतवैद्यकीय राज्य सामायिक परीक्षा कक्षातर्फे सीईटी घेण्यात आली होती. सीईटी परीक्षेच्या निकालासोबतच इंजिनिअरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार १७ जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. १७ जूनपर्यंतच अर्ज व कागदपत्र पडताळणी करता येणार आहे. १९ जूनला प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर होणार असून, २२ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

Web Title: Deadline for registration today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.