ब्राह्मणगावी वीज पडून बंगल्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 12:48 AM2021-10-06T00:48:46+5:302021-10-06T00:50:36+5:30

ब्राह्मणगाव येथे सोमवारी रात्री जोरदार पाऊस सुरू असताना वीज पडून शेतात राहणारे दीपक जगन्नाथ खरे यांच्या बंगल्याचे नुकसान झाले.

Damage to bungalow due to power outage in Brahmangaon | ब्राह्मणगावी वीज पडून बंगल्याचे नुकसान

ब्राह्मणगाव येथे वीज पडून दीपक जगन्नाथ खरे यांच्या बंगल्याचे झालेले नुकसान.

googlenewsNext

ब्राह्मणगाव : येथे सोमवारी रात्री जोरदार पाऊस सुरू असताना वीज पडून शेतात राहणारे दीपक जगन्नाथ खरे यांच्या बंगल्याचे नुकसान झाले. गावात शंकर परदेशी यांचे इलेक्ट्रिक इन्व्हर्टर, प्रशांत बागड यांचा टीव्ही, तर रमेश अहिरे यांचे सेट टॉप बॉक्सचे नुकसान झाले आहे.विजेचा कडकडाट एवढा जोरात होता की, सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर कडक उन्हानंतर रात्री साडे आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत तर, पहाटे साडे चार वाजता मोठा पाऊस झाला. पावसाबरोबर विजाही मोठमोठ्याने चमकत होत्या. त्यात वीज पडून प्रहार संघटनेचे नेते दीपक खरे यांच्या बंगल्याच्या छतावर नुकसान झाले तर, भिंतीला तडेही गेले आहेत. यात कुणाला शारीरिक इजा झाली नाही हे महत्त्वाचे. या परिसरात पहिल्यांदाच एवढा जोरात पाऊस झाला.

Web Title: Damage to bungalow due to power outage in Brahmangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.