लोहोणेर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:07 AM2018-02-17T01:07:07+5:302018-02-17T01:07:19+5:30

तिरुपती व्हॅली इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत व उल्लेखनीय यश मिळवणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करत उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन वक्ते संदीप सावंत यांनी केले. अध्यक्षस्थानी तिरुपती व्हॅली शिक्षणसंस्थेचे संस्थापक बंडू अहेर होते.

 Cultural program at Lohonar School | लोहोणेर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

लोहोणेर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

googlenewsNext

लोहोणेर : तिरुपती व्हॅली इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत व उल्लेखनीय यश मिळवणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करत उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन वक्ते संदीप सावंत यांनी केले. अध्यक्षस्थानी तिरुपती व्हॅली शिक्षणसंस्थेचे संस्थापक बंडू अहेर होते.  संस्थेच्या अध्यक्ष माधुरी अहेर यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले, तर सहसचिव सौरभ अहेर यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, गुणवत्ता यादीत प्रथम आलेले तसेच कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्याथ्यांना पारितोषिके देत त्यांचा गौरव करण्यात आला.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार, शिक्षण विस्ताराधिकारी सतीश बच्छाव, केंद्रप्रमुख दिलीप पाटील, संजय ब्राह्मणकर, घनश्याम बैरागी, संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश सावळे, डॉ. सुरेश आहेर, डॉ. वंदना आहेर, किशोर पगार, विश्वनाथ गुंजाळ, पूजाराज आहेर, कार्यकारी अधिकारी वर्षा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती तिडके, ऋतुजा आहेर या विद्यार्थ्यांसह रु पाली आहेर व निकिता पवार यांनी केले तर मुख्याध्यापक शरद महाजन यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन संदीप सावंत यांनी केले. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळविली. देशभक्तीपर कार्यक्रमांना मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले.

Web Title:  Cultural program at Lohonar School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा