सांस्कृतिक मेजवानी : जिल्हा प्राथमिक फेरीत घेता येणार भरगच्च नाट्यप्रयोगांचा आस्वाद उद्यापासून बालनाट्य स्पर्धेची वाजणार तिसरी घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:41 AM2018-01-07T00:41:53+5:302018-01-07T00:42:43+5:30

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सोमवार (दि. ८) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Cultural banquet: In the district primary round, the theater will be played in the Ballet tournament for the third time. | सांस्कृतिक मेजवानी : जिल्हा प्राथमिक फेरीत घेता येणार भरगच्च नाट्यप्रयोगांचा आस्वाद उद्यापासून बालनाट्य स्पर्धेची वाजणार तिसरी घंटा

सांस्कृतिक मेजवानी : जिल्हा प्राथमिक फेरीत घेता येणार भरगच्च नाट्यप्रयोगांचा आस्वाद उद्यापासून बालनाट्य स्पर्धेची वाजणार तिसरी घंटा

Next

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सोमवार (दि. ८) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस चालणाºया या नाट्ययज्ञात २५ हून अधिक नाट्यप्रयोगांची मेजवानी नाशिककर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरी अंतर्गत सोमवारी (दि. ८) विंध्यवासिनी बालविद्या संस्थेचे ‘अशी पाखरे येती’, वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिराचे ‘ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ‘एक रात्र भुताची’, सूर्या शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे ‘मोबाइल नको रे बाबा’ तर स्वामिनारायण इंग्लिश मीडिअम स्कूलतर्फे ‘वाºयावरची वरात’ तर मंगळवारी (दि. ९) ओम साई सच्चिदानंद सामाजिक संस्थेचे ‘ड्रायव्हर’, श्रीरंगनगर मित्रमंडळाचे ‘घरटे’, प्रबोधिनी ट्रस्टचे ‘आभासी जग’, अभिनव बालविकास शाळा नं. १ यांचे ‘अदिबाबाच्या बेटावर’, अभिनव बालविकास शाळा नं. २ यांचे ‘श्यामची आई’, सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर यांचे ‘एलियन्स दि ग्रेट’ तसेच बुधवारी (दि. १०) मेनली अ‍ॅमॅच्युअर्स संस्थेचे ‘मला मोठं व्हायचं’, मानवधन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे ‘याला जबाबदार कोण’, नवीन मराठी शाळा नाशिकरोड संस्थेचे ‘लालयेत पज्चवर्षाणि’, ओम गुरूदेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुकुल अहमनगर शाळेचे ‘राजा शिवबा’, ओम गुरू देव इंग्लिश मीडिअम स्कूल अहमदनगर यांचे ‘दांडगी मुलं’ आदी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (दि. ११) रचना विद्यालय नाशिक यांचे ‘वन वे’, लोकहितवादी मंडळाचे ‘दशावतार’, कृपा शैक्षणिक सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे ‘लेट्स बिगीन’, इंदिरा भारती कर्णबधिर निवासी विद्यालय इगतपुरी यांचे ‘झीरो बन गया हीरो’, ग्लोबल व्हिजन इंग्लिश स्कूल यांचे ‘पाण्यापायी पडला घाव’, शुक्रवारी (दि. १२) दीपक मंडळ सांस्कृतिक विभागाचे ‘गोट्या’, विद्या प्रबोधिनी प्रशालेचे ‘ताटी उघडा’, बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव, अहमदनगरचे ‘सिद्राम सुडोकू’, अश्वमेध थिएटर्सचे ‘चौदाशे भागिले चौदा’ तर स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (दि. १३) कलाभ्रमंती संस्थेचे ‘ट्रॅजेडी’, अग्नेय गुरुकुल लोकसेवा प्रतिष्ठान, अहमदनगर यांचे ‘मी एक बोन्साय’, आत्मा मालिक इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अहमदनगर यांचे ‘झेप’ तर अहमदनगर जिल्हा हौशी नाट्यसंघाच्या ‘मुलाकात’ या नाटकाने स्पर्धेची सांगता होणार आहे.

Web Title: Cultural banquet: In the district primary round, the theater will be played in the Ballet tournament for the third time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.