फटाके विक्रेत्यांचा फुटला बार

By admin | Published: October 31, 2016 02:04 AM2016-10-31T02:04:22+5:302016-10-31T02:07:04+5:30

असुरक्षित विक्रीला चाप : मनपाची पोलीस ठाण्यात धाव

The crack bar of crackers | फटाके विक्रेत्यांचा फुटला बार

फटाके विक्रेत्यांचा फुटला बार

Next

नाशिक : गाळ्यांच्या लिलावापूर्वी व नंतरही अग्निशामक विभाग, करवसुली विभागाकडून वारंवार लेखी सूचना देऊनही काही मुजोर फटाका विक्रेत्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत टाळाटाळ के ली जात होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीत असुरक्षित फटाका विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारींनुसार पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
औरंगाबादला फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शहरातील महापालिका व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. महापालिकेच्या कर वसुली व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने शहरातील फटाका विक्री करणाऱ्या दुकानांची पाहणी केली. यावेळी डोंगरे वसतिगृह मैदानावर ३२ फटाका असुरक्षित फटाका विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची पालिका अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

Web Title: The crack bar of crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.