दहशतवादविरोधी कक्षाने भाडेकरूंची माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:38 AM2017-11-29T00:38:57+5:302017-11-29T00:39:21+5:30

पाथर्डी फाटा येथील एका इमारतीत अहमदनगर येथील कुविख्यात बेग टोळीतील सराईत गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने दहशतवादविरोधी कक्षाने आता थेट महापालिकेला पत्र पाठवून त्यांच्याकडे भाडेकरूंसंबंधी असलेल्या नोंदी मागविल्या आहेत. त्यामुळे स्वत:हून भाडेकरूंची माहिती पोलिसांना सादर न करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

 Counter-terrorism Cell has asked for rent information | दहशतवादविरोधी कक्षाने भाडेकरूंची माहिती मागविली

दहशतवादविरोधी कक्षाने भाडेकरूंची माहिती मागविली

Next

नाशिक : पाथर्डी फाटा येथील एका इमारतीत अहमदनगर येथील कुविख्यात बेग टोळीतील सराईत गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने दहशतवादविरोधी कक्षाने आता थेट महापालिकेला पत्र पाठवून त्यांच्याकडे भाडेकरूंसंबंधी असलेल्या नोंदी मागविल्या आहेत. त्यामुळे स्वत:हून भाडेकरूंची माहिती पोलिसांना सादर न करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.  काही दिवसांपूर्वीच पाथर्डी फाटा येथील एका इमारतीत अहमदनगर येथील कुख्यात गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भातील नियम कडक केले आहेत. शहरात घर भाड्याने घ्यायचे असेल तर आधारकार्ड, पॅनकार्डसारखे पुरावे बंधनकारक केले; शिवाय घर भाडेतत्त्वावर देताना संबंधित  भाडेकरूची माहिती प्रथम संबंधित पोलीस ठाण्याला कळविण्याचेही आवाहन करण्यात आले. पोलिसांनी याबाबत वारंवार आवाहन करूनही घरमालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे कठोर पाऊल उचलले. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच सातपूर पोलिसांनी सोमेश्वर कॉलनीतील २० खोल्यांची चाळ असलेल्या घरमालकावर गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, घरमालक आपणहून प्रतिसाद देत नसल्याने दहशतवादविरोधी कक्षाने आता त्यासाठी महापालिकेची मदत मागितली आहे. कक्षाने महापालिकेकडून त्यांच्या दप्तरी असलेल्या भाडेकरूंची माहिती मागविली आहे. त्यानुसार विभागनिहाय माहिती गोळा केली जाणार असून, सातपूर, नाशिक पूर्व व पंचवटी विभागाकडून अद्याप माहिती प्राप्त झाली नसल्याचे महापालिकेला कळविण्यात आले आहे. 
घरमालकांचा महापालिकेलाही चुना
 पोलिसांनी महापालिकेकडे भाडेकरूंची माहिती मागविली असली तरी ती पूर्णत: प्राप्त होणे अशक्य आहे. घरमालकाने आपले घर कुणाला भाड्याने दिले असल्यास त्याला व्यावसायिक दराने घरपट्टी आकारली जाते. त्यामुळे घरमालक भाडेकरू भरल्याची माहिती महापालिकेलाही कळवत नाहीत. परिणामी, महापालिकेकडेही त्याबाबतच्या अद्ययावत नोंदी नाहीत. मात्र आता मिळकत सर्वेक्षणाच्या माध्यमातून बºयाच प्रमाणात माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title:  Counter-terrorism Cell has asked for rent information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.