कचऱ्याचा दूषित धूर ओझरकरांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 07:39 PM2022-03-31T19:39:33+5:302022-03-31T19:40:36+5:30

ओझर (सुदर्शन सारडा) : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगाने हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक्त प्राणवायूमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.

Contaminated smoke from Ozarkar's throat | कचऱ्याचा दूषित धूर ओझरकरांच्या घशात

कचऱ्याचा दूषित धूर ओझरकरांच्या घशात

Next
ठळक मुद्देजीवघेणा प्राणवायू : हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सुदर्शन सारडा

ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगाने हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक्त प्राणवायूमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.

सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोड जवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेक जण हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ओझर येथे बाणगंगा नदी किनारी मारुती वेस स्मशानभूमी मागे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो असून, गावातील तसेच उपनगरातील सर्व कचरा हा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो. परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट रात्री जाळून लावण्यात येत असल्याने तो नागरिकांच्या जीवावर उठत आहे. ओला सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता होत आहे.

कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे तर नदी पलीकडे शेती व शेलार, शिंदे, कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या सहाय्याने डम्पिंग करत असताना त्याची प्रचंड दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागली होती. सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने पसरत असलेल्या धुराचे लोळ दुर्गंधीमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सार्वजनिक शौचालय याच ठिकाणी असल्याने कुबट वासाचा सामना लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना देखील करावा लागत आहे.

मुख्य गावात सकाळ सायंकाळ धुराची कुबट दुर्गंधी येत आहे.यामुळे लहान बालकांपासून ते आबालवृद्धांपर्यंत अनेकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अनेकांना दम्याचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे पाण्यातूनदेखील संसर्गजन्य आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर डम्पिंग ग्राउंडविषयी नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित पावले उचलण्याची विनंती आता नागरिक करू लागले आहे. जेणेकरून दररोज उद्भवणाऱ्या त्रासापासून सुटका होईल.

Web Title: Contaminated smoke from Ozarkar's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.