सेवाशर्तीच्या भंग केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:57 PM2019-05-13T17:57:29+5:302019-05-13T18:01:37+5:30

कळवण : कनाशी येथील मंडळ अधिकारी यांनी सेवाशर्तीचा भंग केल्याप्रकरणी प्राप्त तक्र ारीनुसार सविस्तर चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना केले आहे. या प्रकरणी नाशिक येथील हिम्मत पवार यांनी सेवाशर्तीचा भंग झाल्याची तक्र ार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Complaint about service violation | सेवाशर्तीच्या भंग केल्याची तक्रार

सेवाशर्तीच्या भंग केल्याची तक्रार

Next
ठळक मुद्देकनाशीच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

कळवण : कनाशी येथील मंडळ अधिकारी यांनी सेवाशर्तीचा भंग केल्याप्रकरणी प्राप्त तक्र ारीनुसार सविस्तर चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना केले आहे. या प्रकरणी नाशिक येथील हिम्मत पवार यांनी सेवाशर्तीचा भंग झाल्याची तक्र ार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळवण तालुक्यातील वरखेडा येथील गट नं १३० साठी पुंडलिक सोनवणे यांनी तहसीलदार यांच्याकडे वाग वहीवाटीसाठी अर्ज केला होता. मोजणी संदर्भात कब्जेदार याने अर्जदार सोनवणे यांच्यात आपसात समजोता होऊन मोजणी अंती ज्याच्याकडे ज्यादा क्षेत्र निघेल ते काढून देण्याचे मान्य केले, परंतु कालांतराने सोनवणे यांनी पोटहिस्सा मोजणीस नकार दिला.
त्यामुळे सदर वादांकित प्रश्न अद्याप निकाली निघालेला नसताना कनाशी मंडळ अधिकारी यांनी जाब जबाब, नोटीस, आम्हाला कुठेही विश्वासात न घेता पुंडलिक सोनवणे यांच्या लाभासाठी चुकीचा अहवाल कळवणंचे तहसीलदार यांच्या कार्यालयात सादर करून अन्याय केल्याची तक्र ार हिम्मत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
आॅक्टोबर २०१८ मध्ये तक्र ारदार हिम्मत पवार यांना विश्वासात न घेता परस्पर पंचनामा करून मंडळ अधिकारी कनाशी यांनी महसूल यंत्रणेची दिशाभूल करून आमच्यावर अन्याय केला असल्याचे तक्र ारीत नमूद केले आहे. गट नं १३०/१ व १३०/२ असे एकूण चार सहकब्जेदार यात विखुरलेला आहे.

Web Title: Complaint about service violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी