सिडकोत प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:05 AM2018-11-13T00:05:00+5:302018-11-13T00:05:32+5:30

महापालिका प्रशासनाच्या वतीने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिडको, अंबड व परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असून, त्याला आळा घालण्यास मनपाचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार अपयशी ठरला आहे.

 The common use of Cidcox Plastic Bags | सिडकोत प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

सिडकोत प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

Next

सिडको : महापालिका प्रशासनाच्या वतीने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिडको, अंबड व परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असून, त्याला आळा घालण्यास मनपाचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार अपयशी ठरला आहे.
सिडको, अंबड परिसरातील भाजीपाला व्यावसायिक, फळविक्रेत्यांसह लहान-मोठ्या किराणा तसेच इतर दुकानांमध्ये सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यात येत असून, मनपाच्या आरोग्य विभागाकडून मात्र विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनपाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले असल्याने प्लॅस्टिकच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  एकीकडे शासनाच्या वतीने प्रदूषणावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी त्याची अंमलबजावणी महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने केली जात नाही. मनपाने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरणाºयांवर कारवाई करणे गरजेचे असून कारवाई करताना गुप्तता बाळगणे तसेच दंडात्मक कारवाई करताना स्थानिक अधिकारी व कर्मचाºयांना न घेता स्वतंत्र टीम करणे गरजेचे आहे.

Web Title:  The common use of Cidcox Plastic Bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.