राज्यात सर्वाधिक थंडी

By admin | Published: November 2, 2016 11:16 PM2016-11-02T23:16:25+5:302016-11-02T23:23:40+5:30

राज्यात सर्वाधिक थंडी

The coldest in the state | राज्यात सर्वाधिक थंडी

राज्यात सर्वाधिक थंडी

Next

नाशिक : राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही नाशिक अधिक थंड झाले आहे. बुधवारी (दि. २) नाशिक चे किमान तपमान १०.५ अंश इतके नोंदविले गेले.
यावर्षी नाशिक जिल्ह्णात थंडीने दमदार आगमन केले आहे. मंगळवारी (दि.१) नाशिकचे किमान तपमान १३.७ अंशावर होते; मात्र एका दिवसात पारा अचानकपणे घसरून थेट तीन अंशांनी कमी झाल्याने बुधवारी सकाळी किमान तपमान १०.५ इतके असल्याची नोंद हवामान खात्याने केली. यामुळे राज्यातील नाशिक हे सध्या सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण बनले आहे.
नाशिकचा पारा सातत्याने घसरू लागल्याने यावर्षी नाशिककरांना हुडहुडी भरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. बुधवारी शहरात पहाटे मोठ्या प्रमाणावर थंडी होती, तसेच संध्याकाळी सात वाजेपासून थंडीचा कडाका जाणवू लागल्याने गोदाकाठी वास्तव्यास असलेल्या भटक्यांनी शेकोटी पेटवित थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (दि.३१) किमान तपमान १४.५ इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर सातत्याने तपमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढत आहे. बुधवारी नीचांकी तपमानाची नोंद नाशकात झाली आहे. सातत्याने घसरत असलेल्या पाऱ्यामुळे जिल्ह्णात येत्या काही दिवसांमध्ये थंडीची लाट वाढणार असल्याची शक्यता वाढली आहे.
जिल्ह्णात थंडीचा वाढता जोर लक्षात घेता पुणे, औरंगाबाद महामार्गासह त्र्यंबकेश्वर रस्त्यावरदेखील उबदार कपडे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. सिन्नरच्या मोहदरी घाटाच्या प्रारंभी मोठ्या संख्येने महामार्गालगत उबदार कपडे विक्रेत्यांनी दुकाने लावली आहेत. एकूणच थंडीचा कडाका शहरात वाढू लागल्याने नाशिककरांची पावले उबदार कपड्यांच्या खरेदीकडे वळू लागली आहेत.

Web Title: The coldest in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.