श्रमदानातून सुळे डाव्या कालव्याची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:38 PM2018-06-14T14:38:23+5:302018-06-14T14:38:23+5:30

खामखेडा - येथील शेतकऱ्यांनी श्रमदानातून सुपले दिगर धरणा जवळील सुळे डाव्या कालव्याची साफसफाई केली.

Cleanliness of the left canal from labor | श्रमदानातून सुळे डाव्या कालव्याची साफसफाई

श्रमदानातून सुळे डाव्या कालव्याची साफसफाई

Next

खामखेडा - येथील शेतकऱ्यांनी श्रमदानातून सुपले दिगर धरणा जवळील सुळे डाव्या कालव्याची साफसफाई केली. कळवण तालुक्यातील सुपले दिगर धरणापासून सुळे डावा कालवा काढण्यात आला असून, येथे खडकाळ भाग असल्याने कालव्याच्या दोन्ही बाजूला पाणी पाझरून कालव्याच्या दोन्ही बाजूला काँक्रि टीकरण करण्यात आलेले आहे . हा कालवा सुळे - हुड्यामुख- मोकभनगी -बिजोरे-विसापूर - पिळकोस-खामखेडा- सावकी असा आहे .या सुपले दिगर धरणातून या सुळे कालव्यात पाणी सोडण्यात येते.या धरणातून सुळे डाव्या कालव्यात पाणी सोडण्यासाठी मोरीचा सोय करण्यात आली आहे. परंतु या कालव्याच्या पाटचारीत आजूबाजूची दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती, दगड, गोटे पडल्याने या पाटात पाणी सोडल्यास पाणी पाटातून पुढे न जाता पाटाच्या आजूबाजूला पडत होते. पाटाच्या आजूबाजूला मोठ्यास प्रमाणात खोलगट भाग असलंयाने याठिकाणी जेसीपी, किंवा पोकलेन मशीन जात नसल्याने माती काढणे मोठे मुश्किल झाले होते. त्यामुळे खामखेडा येथून शेतकरी भाकरी बांधून स्वत: वाहने करून श्रमदानातून एका दिवसात पाटातील माती काढली.
------------------------
सुळे डावा कालवा सावकी शिवारापर्यत होऊन दोन वर्षे होत आली.परंतु अजून या पाटाला पाणी नाही. उन्हाळ्यात पाणी फक्त पिळकोस गावाच्या शिवपर्यत येते.त्याच्या पुढे येत नाही.तेव्हा पावसाळ्यात पुरपाणी या सुळे डाव्या कालव्यातुन सोडल्यास या पुरपाण्याने परिसरातील धरणे, लाहन मोठी बंधारे भरूले जातील आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मदत होणार असल्याने आम्ही सर्व शेतकरी पावसाळ्यातील पुरपाणी मिळावे म्हणून पाटबंधारे विभागाकडे मागणी केली. या कालव्यात पावसाळ्यात पाणी सोडताना अडचण येईल म्हणून आम्ही सर्व शेतक-यांनी पाटात पडलेली सर्व माती काढली .
- संजय मोरे, शेतकरी 

Web Title: Cleanliness of the left canal from labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक