मातोरी येथे स्वच्छता अभियान ; परिसर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:03 AM2018-09-26T00:03:54+5:302018-09-26T00:11:21+5:30

ग्राम स्वच्छतेचा भाग म्हणून मातोरी गावात पहिल्या टप्प्यात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामसेवक, सरपंच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.

 Cleanliness drive at Matori; Clean the premises | मातोरी येथे स्वच्छता अभियान ; परिसर स्वच्छ

मातोरी येथे स्वच्छता अभियान ; परिसर स्वच्छ

googlenewsNext

मातोरी : ग्राम स्वच्छतेचा भाग म्हणून मातोरी गावात पहिल्या टप्प्यात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामसेवक, सरपंच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.  ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत शासनाने राज्यभर स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती व स्वच्छतेची सुरुवात केली असून, त्या अंतर्गत मातोरी गावात ग्राम स्वच्छता कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यासाठी शासन स्तरावरून संपर्क अधिकारी आर. डी. शिरोडे यांची नेमणूक करण्यात आली. ग्राम स्वच्छता अभियानात सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येणार असून, प्लॅस्टिक गोळा करणे, नागरिकांमध्ये शौचालय वापरण्याबाबत जनजागृती करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानुसार गावातील गल्ली नंबर एक, शिवाजी पुतळा, सरकारी दवाखाना, प्राथमिक शाळेची साफसफाई करण्यात आली. यावेळी संपर्क अधिकारी आर. डी. शिरोडे, आरोग्य सेविका एन. डी. जाधव, आरोग्य सेवक बी. डी. बडरे, ग्रामसेवक ए. एस. मवाळ, सरपंच आरती रोकडे, उपसरपंच शरद तांदळे, सुरेखा रायकर, शोभा भदाणे, योगिता मोहिते, रंजना साठे, उज्ज्वला दाते, जीवन बर्वे, रवि भोर, बाळासाहेब चारोस्कर आदींनी सहभाग घेतला.

Web Title:  Cleanliness drive at Matori; Clean the premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.