शहर बस तोट्यात की नफ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:32 AM2018-04-30T00:32:42+5:302018-04-30T00:32:42+5:30

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

City profits that loss? | शहर बस तोट्यात की नफ्यात?

शहर बस तोट्यात की नफ्यात?

Next
ठळक मुद्देविभाग नियंत्रकांची परस्परविरोधी भूमिकापरिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाºया शहर बससेवेच्या फेºया गेल्या वर्षी तोट्याचे कारण दाखवून बंद करण्याचे प्रकार परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे शहरातील प्रवाशांची वाहतूक करणारी बससेवा अचानक तोट्यात कशी गेली, असा सवाल त्यावेळी करण्यात येऊन बंद केलेल्या प्रवासी फेºया सुरू करण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. बस फेºयांच्या कपातीमुळे नोकरदार, शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना परिवहन महामंडळाने शहर बससेवा बंद करून ती नाशिक महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला व त्यामागे दरमहा होणाºया आर्थिक तोट्याचे कारण दिले आहे.
नाशिक महापालिकादेखील शहर बससेवा चालविण्यास उताविळ झाल्याने त्यांनी या संदर्भातील व्यवहार्यता तपासण्यासाठी पैसे खर्च करून तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. असे असताना सदरची बससेवा परिवहन

शहर बस तोट्यात की नफ्यात?
(पान १ वरून)
महामंडळानेच चालवावी यासाठी नाशिकचे उदय कुलकर्णी यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून विनंती केली व बससेवा बंद केल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली होती. यावर न्यायालयानेही या पत्राची दखल घेत परिवहन महामंडळ व महापालिकेला याबाबत विचारणा केली असता, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत शहर बससेवेतून दरवर्षी होणारा आर्थिक तोटा कमी झाल्याचे म्हटले आहे.
या संदर्भात विभाग नियंत्रकांनी तोट्याचा महिनानिहाय तक्ता जोडला असून, त्यात एप्रिल २०१७ मध्ये ३ कोटी ८२ लाख रुपये तोटा होता तो आता चक्क फक्त २३ लाखांवर आल्याची आकडेवारी दिली आहे. शहरी फेºयांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्यामुळे तोटा कमी झाल्याचे मान्य केले आहे. फेºया तात्पुरत्या स्थगित शहर बस वाहतूक तोट्यात चालत असल्यामुळेच शहरांतर्गत फेºयांमध्ये कपात करणाºया परिवहन महामंडळाने एकीकडे तोट्यात कपात झाल्याचे सांगतानाच कपात केलेल्या फेºया या काही काळासाठीच स्थगित करण्यात आल्याचे व नंतर त्या पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले आहे. या संदर्भात उदय कुलकर्णी यांना दिलेल्या पत्रात विभाग नियंत्रकांनी म्हटले आहे की, प्रतिवर्षी उन्हाळी सुट्टी कालावधीत शालेय मार्गावरील नियते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येतात व शाळा सुरू होण्याच्या वेळेत त्या फेºया पुनश्च सुरू करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फेºया कमी केल्याने तोटा कमी झाला असे मान्य केले तर दुसरीकडे त्या फेºया पुन्हा सुरू करण्यात येऊनही तोट्यात कमालीची घट होत असल्याचे स्पष्ट झाल्याने परिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: City profits that loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.