शहर परिसरातथंडीचा कडाका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:25 AM2019-01-29T01:25:20+5:302019-01-29T01:25:36+5:30

शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारच्या तुलनेत एक अंशाने किमान तापमान सोमवारी (दि.२८) वाढले असले तरी संध्याकाळपासून पुन्हा थंड वाऱ्याचा वेग अधिक वाढला होता.

 In the city area, there was a ruckus | शहर परिसरातथंडीचा कडाका कायम

शहर परिसरातथंडीचा कडाका कायम

Next

नाशिक : शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारच्या तुलनेत एक अंशाने किमान तापमान सोमवारी (दि.२८) वाढले असले तरी संध्याकाळपासून पुन्हा थंड वाऱ्याचा वेग अधिक वाढला होता. यामुळे नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. सोमवारी सकाळी ९.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले.  पाच दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. वातावरणात प्रचंड गारवा वाढल्यामुळे नाशिककरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि.२७) ८.१ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. शहरात गुरुवारपासून आलेली शीतलहर अद्यापही कायम आहे. त्यामुळे नाशिककर थंडीच्या कडाक्याने गारठले आहे. संध्याकाळपासून थंड वारे वेगाने वाहण्यास सुरुवात होत असल्याने रात्री थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे.  थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर पुन्हा परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप यांसारख्या आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाणी उकळून थंड करून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Web Title:  In the city area, there was a ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.