पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 02:37 PM2019-05-12T14:37:18+5:302019-05-12T14:37:25+5:30

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी हि संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

 Citizens suffer from severe water scarcity | पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त

पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त

Next
ठळक मुद्देलोहोणेर येथे गिरणा नदीत असलेल्या उदभव विहीरीवर व कुपनलिकांवर देवळा शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. गिरणा नदीतून हे पाणी सरस्वती वाडी येथील जलकुंभात टाकण्यात येथे व नंतर ते वितरीत केले जाते. गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाण्याचे आवर्तन सुटते त्या का

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी हि संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
लोहोणेर येथे गिरणा नदीत असलेल्या उदभव विहीरीवर व कुपनलिकांवर देवळा शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. गिरणा नदीतून हे पाणी सरस्वती वाडी येथील जलकुंभात टाकण्यात येथे व नंतर ते वितरीत केले जाते. गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाण्याचे आवर्तन सुटते त्या काळात देवळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू असतो. पुरंतु गिरणा नदीचे पात्र कोरडे झाले कि शहराचा पाणीपुरवठा ठप्प होतो व शहरात पाणीटंचाई निर्माण होते. गिरणा नदीला पुढचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यावर शहराचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरू होतो. परंतु या आवर्तनांच्या मधील काळात नगर पंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. सरस्वती वाडी येथील पाण्याचा जलकुंभ भरला कि शहरात आळीपाळीने सर्व भागात पाणीपुरवठा केला जातो. यामुळे पाणी सोडण्याच्या वेळ जलकुंभ भरण्यावर अवलंबून असते. सद्या आठ दिवसातून अर्धा तास नळांना पाणी येते. परंतु त्याने शहरातील नागरीकांची गरज भागात नाही व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
नगरपंचायतीने यातून मार्ग काढत टँकर आपल्या दारी हि संकल्पना राबवत सहा टँकरद्वारे शहर व उपनगरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक घरापुढे टँकर उभा करून घरासाठी २०० लिटर पाणी दिले जात आहे. यामुळे टँकरच्या पाण्यासाठी नागरीकांची गर्दी, गोंधळ, तसेच पाण्याची नासाडी होत नाही. ज्या घरापुढे टँकर आला कि त्या घरातील महिलांना शांतपणे पाणी भरता येते. तिसऱ्या दिवशी शहराच्या प्रत्येक भागात पाण्याचा टँकर येत असल्यामुळे नागरीकांना पाणीटंचाईच्या झळा सुसहय होत आहेत. गिरणा नदीला पुढील आवर्तन येईपर्यंत नागरीकांना नगरपंचायतीचे पाण्याचे टँकर मोठा आधार ठरत आहेत.
फोटो -देवळा येथे सटाणा रोडवरील एका घरासमोर नगरपंचायतीच्या पाण्याचा टँकर आल्यानंतर पाणी भरतांना त्या घरातील महिला. (१२देवळा टॅँकर)

Web Title:  Citizens suffer from severe water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.