सिडकोत घरफोडीत ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:19 AM2018-09-23T00:19:40+5:302018-09-23T00:20:18+5:30

सिडको परिसरातील राजरत्ननगर येथील रहिवासी नंदलाल शेषराव इप्पर (३१) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी शोकेसमधील सुमारे ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

 Cidcoat house collapses worth 48 thousand 500 rupees jewelry | सिडकोत घरफोडीत ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास

सिडकोत घरफोडीत ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास

Next

नाशिक : सिडको परिसरातील राजरत्ननगर येथील रहिवासी नंदलाल शेषराव इप्पर (३१) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी शोकेसमधील सुमारे ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.  राजरत्ननगर येथील इप्पर यांच्या बंद घरात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील लोखंडी शोकेसची झाडाझडती घेत त्यामधील १६ ग्रॅमचा सोन्याचा ३२ हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, दहा हजारांचे कानातील पाच ग्रॅमचे कर्णफुले, सहा हजार रुपयांची तीन ग्रॅमची अंगठीसह स्वयंपाकाचा एलपीजी सिलिंडर चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.

Web Title:  Cidcoat house collapses worth 48 thousand 500 rupees jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.