भार्गव गायकवाड यांना चिवनिंग पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:53 AM2018-06-13T00:53:09+5:302018-06-13T00:53:09+5:30

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व विकसित करण्यासाठी इंग्लड सरकारतर्फे देण्यात येणार प्रतिष्ठेचा चिवनिंग पुरस्कार नाशिकचे डॉ. भार्गव गायकवाड यांना प्राप्त झाला आहे. डॉ. भार्गव यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमडी पदवी प्राप्त केली असून, भारतातील दहा हजार विद्यार्थ्यांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Chivaning Award for Bhargava Gaikwad | भार्गव गायकवाड यांना चिवनिंग पुरस्कार

भार्गव गायकवाड यांना चिवनिंग पुरस्कार

Next

नाशिकरोड : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व विकसित करण्यासाठी इंग्लड सरकारतर्फे देण्यात येणार प्रतिष्ठेचा चिवनिंग पुरस्कार नाशिकचे डॉ. भार्गव गायकवाड यांना प्राप्त झाला आहे. डॉ. भार्गव यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमडी पदवी प्राप्त केली असून, भारतातील दहा हजार विद्यार्थ्यांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  इंग्लड सरकारच्या जागतिक स्कॉलरशिप प्रोग्रामचा चिवनिंग पुरस्कार हा एक भाग असून, हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉक्टरांना युनायटेड किंगडममध्ये शिक्षणाची संधी प्राप्त होते. ब्रिटिश उच्चायुक्त व उच्च आयुक्तालयातर्फे १४४ देशांमधून पुरस्कारार्थी निवड करून नेतृत्व क्षमता असलेल्या जागतिक विद्वानांना युनायटेड किंगडम विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळते. यावर्षी हा बहुमान डॉ. भार्गव गायकवाड यांना मिळाला आहे. डॉ. भार्गव हे केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचे पुत्र आहेत.
सामाजिक कार्याचा सन्मान
डॉ. भार्गव गायकवाड यांच्या सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांना चिवनिंग पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी उत्तराखंडच्या आदिवासीबहुल जिल्ह्यात वैद्यकीय सेवा दिली असून, डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातही ते वैद्यकीय सेवा देत असतात.

Web Title: Chivaning Award for Bhargava Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक