गारठा कायम : राज्यात सर्वाधिक कडाका नाशिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 07:21 PM2019-01-27T19:21:09+5:302019-01-27T19:24:51+5:30

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही कडाक्याची थंडी होती. दुसºया आठवड्यात काही दिवस दिलासा मिळाला कारण किमान तापमानाचा पारा थेट १२ अंशापार पोहचला होता; मात्र मकरसंक्रांतीनंतर पुन्हा तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीची लाट शहरात अनुभवयास येत आहे.

Chilli prevails: Nashik gets highest peak in the state | गारठा कायम : राज्यात सर्वाधिक कडाका नाशिकला

गारठा कायम : राज्यात सर्वाधिक कडाका नाशिकला

Next
ठळक मुद्दे थंड वा-यांचा वेगा रविवारी संध्याकाळी काहीसा कमी राहिला विवारी सकाळी किमान तापमान थेट ८.१ अंशापर्यंत खाली घसरले.

नाशिक : शहराच्या वातावरणात मागील चार दिवसांपासून कमालीचा बदल जाणवत आहे. वातावरणात गारवा प्रचंड वाढल्यामुळे नाशिककरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि.२७) ८.१ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली असून सर्वाधिक थंडीचा कडाका नाशकात जाणवत आहे.
शहरात मागील गुरूवारपासून शीतलहर आली असून संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत वेगाने थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानावर परिणाम जाणवत आहे. संध्याकाळपासून थंड वाऱ्याचा वेग वाढत असल्याने किमान तापमानाचा पारा घसरत आहे. दिवसाही थंड वारे वाहत असल्यामुळे नागरिक दिवसभर ऊबदार कपडे परिधान करणे पसंत करत आहेत. गुरूवारी किमान तापमान ९.९ अंश तर शुक्रवारी तापमानाचा पारा ९.२ अंशापर्यंत घसरला. शनिवारी ८.३ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. या चार दिवसांमध्ये शहरात थंडीचा कडाका प्रचंड जाणवत आहे. संध्याकाळी तसेच सकाळीदेखील थंड वाºयांचा वेग अधिक राहत असल्यामुळे शनिवारी तसेच रविवारी सकाळीदेखील वातावरणात गारवा जाणवत होता. थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.
मकरसंक्रांतीनंतर थंडी कमी होईल, अशी नागरिक आशा बाळगून होते. कारण डिसेंबरच्या पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही कडाक्याची थंडी होती. दुस-या आठवड्यात काही दिवस दिलासा मिळाला कारण किमान तापमानाचा पारा थेट १२ अंशापार पोहचला होता; मात्र मकरसंक्रांतीनंतर पुन्हा तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीची लाट शहरात अनुभवयास येत आहे. २०१८-१९ मध्ये नाशिककरांनी कडाक्याची थंडी अनुभवली आहे.
रविवारी सकाळपासून थंडीचा कडाका वाढला होता. सकाळी जॉगर्सदेखील कमी संख्येने बाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच सुर्याेदयानंतरही वातावरणात गारवा टिकून राहिला होता. सुर्यप्रकाश प्रखर पडत नसल्याने थंडी दिवसभर नाशिककरांनी अनुभवली. संध्याकाळी पुन्हा थंडीचा जोर वाढला होता. थंड वा-यांचा वेगा रविवारी संध्याकाळी काहीसा कमी राहिला तरी थंडीची तीव्रता कायम होती. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शहरावर ढग दाटून आले होते व थंड वारे वेगाने वाहू लागल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली होती. शनिवारी रात्रीदेखील अशीच स्थिती राहिल्यामुळे रविवारी सकाळी किमान तापमान थेट ८.१ अंशापर्यंत खाली घसरले.

Web Title: Chilli prevails: Nashik gets highest peak in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.