जग सुंदर करण्यासाठी विचार बदला देशमुख : गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:14 AM2018-04-06T01:14:06+5:302018-04-06T01:14:06+5:30

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते.

Changes to make the world look beautiful: Deshmukh: Girna Gaurav Award distribution ceremony | जग सुंदर करण्यासाठी विचार बदला देशमुख : गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा

जग सुंदर करण्यासाठी विचार बदला देशमुख : गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा

Next
ठळक मुद्देचांगल्या विचाराने सुरुवात केली तर आपले जग सुंदर होऊ शकतेछोट्या छोट्या लढायांनी आपल्या देशाच्या विकासाची लढाई

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते रावसाहेब थोरात सभागृह येथे आनंद अ‍ॅग्रो ग्रुप व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित गिरणा गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. गुरुवारी (दि.५) सायंकाळी हा सोहळा दिमाखात पार पडला. ते पुढे म्हणाले की, चांगल्या विचाराने सुरुवात केली तर आपले जग सुंदर होऊ शकते. आपले अनुभवविश्व संपन्न होऊ शकते. छोट्या छोट्या लढायांनी आपल्या देशाच्या विकासाची लढाई आपण लढू शकतो. याप्रसंगी गौरी सावंत (समाजसेवा), अरविंद जगताप (लेखक, दिग्दर्शक), सारिका अहिरराव (पोलीस), अश्विनी बोरस्ते (समाजसेवा), सोमनाथ कोकरे (छायाचित्रकार), डॉ. तानाजी वाघ, विश्वास ठाकूर (सहकार), समाधान हिरे (उद्योजक), कृष्णा भामरे (कृषिमित्र), डॉ. सरोज जगताप (शैक्षणिक), चंद्रशेखर सोनवणे (लायन्स क्लब) यांना मान्यवरांच्या हस्ते गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अमर हबीब यांनी मार्गदर्शन केले. मानिनी दाणी यांनी स्वागतगीत म्हटले. सुरेश पवार यांनी स्वागत केले. वैशाली अहिरे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव अहेर यांनी पुरस्कार निवडीची प्रक्रिया स्पष्ट करतानाच आजवरचे अनुभवही नमूद केले. मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श पोल्ट्री उद्योजक’, ‘आभाळाचा उंबरा’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार प्रतापराव सोनवणे, शशिकांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
चांगले बदल घडविण्यासाठी प्रेरणा घ्यावी
प्रतिकूल परिस्थितीतही समाजात चांगले बदल घडवून आणणाऱ्यांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बदलाकडे वाटचाल करणारी लघुरूपातील ताकद या पुरस्कारार्थींच्या रूपाने दिसत असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Changes to make the world look beautiful: Deshmukh: Girna Gaurav Award distribution ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.