चक्काजाम : नाशिक जिल्ह्यात १२ हजारहून अधिक मालवाहू वाहनांची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 04:29 PM2018-07-20T16:29:04+5:302018-07-20T16:30:52+5:30

देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. या प्रमुख मागण्यासाठी देशभर आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून शुक्रवारपासून (दि.२०)देशभरात  तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद  दिल्याने जिल्हाभरात सुमारे १२ हजारहून अधिक मालवाहतूक करण्याऱ्या वाहणांची चाके थांबली आहे. 

Chakkajam: The wheels of more than 12 thousand cargo vehicles stopped in Nashik district | चक्काजाम : नाशिक जिल्ह्यात १२ हजारहून अधिक मालवाहू वाहनांची चाके थांबली

चक्काजाम : नाशिक जिल्ह्यात १२ हजारहून अधिक मालवाहू वाहनांची चाके थांबली

Next
ठळक मुद्देनाशिकमध्ये वाहतूकदारांच्या संपाला प्रतिसाद१२ हजारहून अधिक वाहनांची चाके थांबली

नाशिक : देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. या प्रमुख मागण्यासाठी देशभर आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून शुक्रवारपासून (दि.२०)देशभरात  तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद  दिल्याने जिल्हाभरात सुमारे १२ हजारहून अधिक मालवाहतूक करण्याऱ्या वाहणांची चाके थांबली आहे. 
जिल्हाभरात १५०० हून अधिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक या संपात सहभागी झाले असून  या आंदोलनासाठी निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स व अवजड वाहतूक सेना यासह विविध संघटनांनीही पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे सरकारने डिझेलच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत आणान्याची तसेच यावरील अधिभार कमी करणे, तसेच देशभरात डीझेलचे दर हे एकसमान असावे, त्याचबरोबर न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा देण्याची मागणी मालवाहतूक दारांनी केली आहे. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून गांधीगिरी पद्धतीने बेमुदत आंदोलन सुरूच राहील. तसेच नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सलग्न असलेले व्यावसायिकांचा एकही ट्रकमधून कुठल्याही मालाची वाहतूक करणार नसल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष अंजू सिंगल, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल चंदा, चेअरमन एम.पी.मित्तल यांनी दिली आहे. माल वाहतूकदारांच्या या देशव्यापी संपात नाशिक जिल्ह्यातून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक अवजड वाहतूक सेना, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसारख्या संघटनांनी सहभाग घेतला असून येत्या दोन दिवसात प्रवासी वाहतूक दार आणि पुढील तीन चे चार दिवसात विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बस वाहतूकदारही सहभागी होणार असल्याची माहिती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली आहे. 

चालकांसाठी भोजनाची सेवा 
देशभरात मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या या संपामुळे ट्रक चालकांनी आपल्या मालाची वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. त्यांच्यासाठी आडगाव ट्रक टर्मिनल, विल्होळी ट्रक टर्मिनल व चेहडी नाका येथे गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रक चालकांसाठी भोजनाची सेवा करण्यात आली आहे. जो पर्यंत हे आंदोलन सुरु राहील तो पर्यंत ट्रक चालकांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सलग्न असलेल्या व्यावसायिकांकडून ट्रक चालकांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सागण्यात आले आहे. 


माल वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरु आहे. यासाठी कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. केवळ मागण्या मान्य होईपर्यंत मालवाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. या आंदोलन काळात कुठलाही माल ट्रकमध्ये लोड केला जाणार नाही. ट्रक चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला न उभी करता ती आडगावसह इतर ट्रक टर्मिनलच्या जागेत लावावी.-जयपाल शर्मा, अध्यक्ष. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन.


 

Web Title: Chakkajam: The wheels of more than 12 thousand cargo vehicles stopped in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.