सभापती मंगला सोनवणे पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:28 PM2019-05-27T17:28:18+5:302019-05-27T17:33:03+5:30

सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांच्या विरु द्ध तेरा संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज सोमवारी (दि.२७) मंजूर करण्यात आला. त्यामुळे सोनवणे यांना अकरा महिन्यातच सभापतीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

Chairman Mangala Sonawane footprint | सभापती मंगला सोनवणे पायउतार

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला प्रविण सोनवणे यांच्या विरोधात अविश्र्वास ठराव तेरा विरुद्ध शुन्य मतांनी पारित करण्यात यावेळी उपस्थित संचालक

googlenewsNext
ठळक मुद्देसटाणा बाजार समिती : अविश्वास ठराव तेरा मतांनी मंजूर

सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांच्या विरु द्ध तेरा संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज सोमवारी (दि.२७) मंजूर करण्यात आला. त्यामुळे सोनवणे यांना अकरा महिन्यातच सभापतीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
मनमानी कारभार आणि पतीदेवांचा वारंवार होणारा हस्तक्षेप यामुळे सभापती मंगला सोनवणे यांच्याबद्दल दुसऱ्या महिन्यापासूनच संचालकांमधील नाराजी चव्हाट्यावर आली होती. मात्र निवड झाल्यापासून सहा महिने अविश्वास आणता येत नसल्यामुळे संचालक अस्वस्थ झाले होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर बारा संचालकांनी एकत्र येत अविश्वास आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. गेल्या १५ मे ला बारा सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे सभापती सोनवणे यांच्या विरु द्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला.
दरम्यान या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची विशेष सभा बोलावण्यात आली. अविश्वास ठरावाच्या बाजूने बारा संचालकांमध्ये व्यापारी गटाचे संचालक श्रीधर कोठावदे यांची भर पडली. तर सभापती सोनवणे यांनी एकटा किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला.
उपनिबंधक बलसाणे यांनी अविश्वास ठराव वाचून दाखवत त्यावर चर्चा केली. त्यानंतर अविश्वास ठरावासाठी मतदान प्रक्रि या हात उंचावून करण्याच्या सूचना दिल्याने १३ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. यात संजय देवरे, प्रकाश देवरे, मधुकर देवरे, संजय सोनवणे, संदीप साळे, नरेंद्र अहिरे, प्रभाकर रौंदळ, पंकज ठाकरे, श्रीधर कोठावदे, सरदारसिंग जाधव, रत्नमाला सूर्यवंशी, सुनिता देवरे, वेणूबाई माळी यांचा समावेश आहे.
जिल्हा उपनिबंधक बलसाणे यांनी सोनवणे यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली. त्यावर त्यांनी लेखी स्वरु पात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी आजच्या बैठकीस केशव मांडवडे, तुकाराम देशमुख, संजय बिरारी, जयप्रकाश सोनवणे हे चार संचालक मात्र गैरहजर होते.
अविश्वास ठरावाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
विश्वासघातमुळे अविश्वास ?
सोनवणे या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर दुसºयाच महिन्याला त्यांच्या विरु द्ध संचालकांमध्ये धुसफूस सुरु झाली. दिवसेंदिवस विरोध वाढत गेल्याने विरोधी संचालकांची संख्याही वाढत गेली. त्यातच लोकसभा निवडणूक येऊन ठेपली. सोनवणे यांचे पती प्रवीण हे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे विश्वासू म्हणून मानले जात. डॉ.भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होई पर्यंत प्रवीण सोनवणे यांनी निवडणूक अंगावर घेतली होती. मात्र अचानक कॉंग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचाराचे नियोजनच सोनवणे यांनी घेतल्याच्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. डॉ. भामरे यांच्या विश्वासू मित्रानेच विश्वास घात केल्याच्या चर्चेला उधाण आले. हीच संधी साधत भामरे यांच्या प्रचारात अग्रेसर असलेल्या संचालकांनी एकत्रित मोट बांधत सोनवणे यांच्यावर अविश्वास आणून त्यांना पायउतार केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: Chairman Mangala Sonawane footprint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.