दुप्पट योजनेसाठी केंद्र , राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:41 AM2018-08-26T00:41:51+5:302018-08-26T00:42:17+5:30

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पाचही कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ व प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली  आहे़

Center, State Government joint venture for double plan | दुप्पट योजनेसाठी केंद्र , राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम

दुप्पट योजनेसाठी केंद्र , राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम

googlenewsNext

नाशिक : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पाचही कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ व प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली  आहे़  समितीतील प्रत्येक विद्यापीठातर्फे तयार केलेला अहवाल हा शासनास सादर केला जाणार आहे़ या सर्व अहवालांवर पुणे येथील यशदामध्ये होणाºया तज्ज्ञांची बैठकीत चर्चा होऊन त्यातून महाराष्ट्र पातळीवरील नियोजनाचा अहवाल केंद्रास पाठविला जाणार आहे़ देशातील सर्व राज्यांच्या अहवालाचे एकत्रीकरण करून केंद्रीय पातळीवर या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे़  शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘शेतकरी उत्पन्न दुप्पट’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पाच्या अहवालासाठीचे प्राथमिक काम विद्यापीठ पातळीवर सुरू केले आहे़ या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ के. पी़ विश्वनाथा व पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमप यांच्या उपस्थितीत चारही विद्यापीठांचे कुलगुरु व तज्ज्ञांची बैठक झाली़ त्यामध्ये प्रत्येक कृषी विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ, प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समितीही नेमण्यात आली आहे़ शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसंबंधी ही समिती अहवाल तयार करणार असून, तो शासनास सादर केला जाणार आहे़  महाराष्ट्रातील पाचही विद्यापीठांनी तयार केलेले अहवाल शासनाकडे आल्यानंतर या अहवालांवर पुण्यातील यशदा येथे तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा होऊन महाराष्ट्र पातळीवर अंतिम नियोजन केले जाईल व हा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल़ केंद्राकडे देशातील सर्व राज्यांचे अहवाल आल्यानंतर केंद्रीय पातळीवर या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे़  लोकसभा वा काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी हा प्रकल्प केंद्राकडून लागू केला जाणार असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे़
प्रकल्पातून महाराष्ट्राला सुमारे ७५ हजार कोटी
महाराष्ट्रातील पाचही विद्यापीठांना सप्टेंबरपूर्वी आपापले अहवाल तयार करावयाचे असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या अहवालावर पुण्यातील यशदामध्ये चर्चा होणार आहे़  या बैठकीला कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री, कृषी आयुक्त, पशुसंवर्धनमंत्री, पशुसंवर्धन आयुक्त उपस्थित राहणार असून, हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे़ या प्रकल्पासाठी महाराष्ट्राला सुमारे ७५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत़

Web Title: Center, State Government joint venture for double plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.