कादवातर्फे एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:07 AM2019-02-07T01:07:31+5:302019-02-07T01:07:35+5:30

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने एकरी ऊस उत्पादन दुप्पट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे उपस्थितीत ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ या विषयावर ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

The campaign for the increase in sugarcane production by Kadav | कादवातर्फे एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी मोहीम

कादवातर्फे एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी मोहीम

Next
ठळक मुद्देमार्गदर्शन : कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शिबिरे

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने एकरी ऊस उत्पादन दुप्पट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे उपस्थितीत ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ या विषयावर ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कादवा कार्यक्षेत्रातील चिंचखेड, वरखेडा, करंजवण, दिंडोरी, लखमापूर येथे ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ याबाबत बीव्हीजी ग्रुपचे भालचंद्र पोळ यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. भालचंद्र पोळ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाणी खतांचे योग्य नियोजन केल्यास उसाचे उत्पादन दुप्पट होणे सहज शक्य असून शेतकºयांनी हे तंत्र आत्मसात करून ऊस उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत शंका समाधान केले. अध्यक्ष श्रीराम शेटे यांनीही मार्गदर्शन केले.उत्पादकांना आवाहन
राज्यात अनेक उत्पादक एकरी १५० टनांपर्यंत उस उत्पादन घेत आहेत; मात्र आपल्या कार्यक्षेत्रात सरासरी एकरी उत्पादन खूप कमी आहे, ते वाढणे अत्यंत गरजेचे आहे. कादवा शेतकºयांना ऊस वाढीसाठी सहकार्य, आवश्यक ते मार्गदर्शन, माफक दरात पाणी माती परीक्षण करून देत असून शेतकºयांनी ऊस वाढी योजनांचा लाभ घेत एकरी ऊस उत्पादन वाढवावे असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.

Web Title: The campaign for the increase in sugarcane production by Kadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.