पोटनिवडणूक : प्रभाग १३ मध्ये तिरंगी सामना आज प्रचाराची रणधुमाळी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:13 AM2018-04-04T00:13:41+5:302018-04-04T00:13:41+5:30

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुसाठी येत्या शुक्रवारी (दि.६) मतदान घेण्यात येणार असून, बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे.

Bye-Elections: The Tri-match in Ward 13 will end in today's campaign | पोटनिवडणूक : प्रभाग १३ मध्ये तिरंगी सामना आज प्रचाराची रणधुमाळी संपणार

पोटनिवडणूक : प्रभाग १३ मध्ये तिरंगी सामना आज प्रचाराची रणधुमाळी संपणार

Next
ठळक मुद्दे६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहेअखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुसाठी येत्या शुक्रवारी (दि.६) मतदान घेण्यात येणार असून, बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे. पोटनिवडणुकीत मनसे, सेना आणि भाजपा उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, मतदानाची तयारी प्रशासनामार्फत सुरू असून, मंगळवारी (दि.३) २५० कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रभाग क्रमांक १३ (क)मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दि. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीत मनसेकडून अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण आणि भाजपाच्या विजया हरिष लोणारी या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. याशिवाय, राष्टÑवादीच्या बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक रंजना ज्ञानेश्वर पवार यांनीदेखील अपक्ष उमेदवारी करत आव्हान दिले आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपली तलवार म्यान केली आहे. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार असल्याने बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे, अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला असून उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्रचार पत्रकांचेही वाटप करत मतदारांना आपली भूमिका समजावून सांगितली जात आहे. मनसेसह भाजपाने मतदानाच्या दिवशी बूथवर प्रतिनिधींच्या नियुक्त्या केल्या असून मतदान स्लिपांचेही वाटप बुधवारी-गुरुवारी केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून, त्यात २४ हजार १४० पुरुष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी प्रभागात ६१ बूथ उभारले जाणार आहेत.

Web Title: Bye-Elections: The Tri-match in Ward 13 will end in today's campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.