पोटनिवडणूक : सेनेच्या बैठकीत कायकर्ते आग्रही भाजपा लढली तर शिवसेनाही लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:15 AM2018-03-10T01:15:48+5:302018-03-10T01:15:48+5:30

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) ची पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह शिवसैनिकांनी पक्षाकडे धरला आहे.

Bye-elections: Shiv Sena will fight if BJP joins Sena's meeting | पोटनिवडणूक : सेनेच्या बैठकीत कायकर्ते आग्रही भाजपा लढली तर शिवसेनाही लढणार

पोटनिवडणूक : सेनेच्या बैठकीत कायकर्ते आग्रही भाजपा लढली तर शिवसेनाही लढणार

Next
ठळक मुद्देबैठकीत पोटनिवडणुकीविषयी चर्चाप्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक जाहीर झाली

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) ची पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह शिवसैनिकांनी पक्षाकडे धरला आहे. शुक्रवारी (दि. ९) महानगरप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाºयांच्या बैठकीत पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी पोटनिवडणुकीत भाजपाने उमेदवार दिला तर शिवसेनाही उमेदवार देणार असल्याचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार येत्या ६ एप्रिलला मतदान होणार असून, दि. १३ मार्चपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाºयांची बैठक मनपातील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात बोलावण्यात आली होती.
भाजपा लढणार अन् जिंकणारही
भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रभाग १३ मधील पोटनिवडणूक भाजपा लढणार असल्याचे आणि ती मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचे म्हटले आहे. पक्षाची बैठक बोलावून उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही सानप यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Bye-elections: Shiv Sena will fight if BJP joins Sena's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.