बसवाहकास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:52 AM2018-03-15T00:52:07+5:302018-03-15T00:52:07+5:30

पिंपळगाव बसवंत : महिलेला बसस्थानकाऐवजी बायपासवर का उतरून दिले, अशी कुरापत काढून पुणे-सटाणा बसच्या वाहकास मारहाण केल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे मंगळवारी (दि. १३) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.

The bus driver filed a case in the assault case | बसवाहकास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

बसवाहकास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमहिलेला बसस्थानकाऐवजी बायपासवर का उतरून दिले कुरापत काढून पुणे-सटाणा बसच्या वाहकास मारहाण

पिंपळगाव बसवंत : महिलेला बसस्थानकाऐवजी बायपासवर का उतरून दिले, अशी कुरापत काढून पुणे-सटाणा बसच्या वाहकास मारहाण केल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे मंगळवारी (दि. १३) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १३) रात्री पुणे-सटाणा बसमधून प्रवास करणाऱ्या पिंपळगाव येथील महिलेच्या निवंतीवरून येथील बायपासवर बस थांबवण्यात आली. महिला खाली उतरली. याचवेळी रोडवर उभे असलेले राजू बूब व प्रमोद बागलाणे (दोघे, रा. पिंपळगाव) व अन्य साथीदारांनी अरेरावी करत महिलेला स्थानकात न उतरवता रोडवर का उतरून दिले अशी कुरापत काढून वाहक देवराम विश्वनाथ टाले रा. सटाणा यास बेदम मारहाण केली.
सदर बसला पिंपळगावी थांबा नाही महिलेच्या विनंतीवरूनच येथे त्यांना उतरून दिल्याचे सांगितले. मात्र त्यांनी काही ऐकून न घेता वाहकास मारहाण केली. व सदर बस स्थानकात नेली. स्थानकातही या तरुणांनी वाहकास पुन्हा मारहाण केली. या प्रकरणी वाहक देवराम विश्वनाथ टाले व चालक रवींद्र अशोक कदम यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजू बूब, प्रमोद बागलाणी व अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईर, राजू जाधव अशोक कदम करीत आहेत.

Web Title: The bus driver filed a case in the assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.