माळवाडी तलाठी कार्यालयाची इमारत मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:08 PM2019-07-18T17:08:48+5:302019-07-18T17:09:06+5:30

ग्रामपंचायतीची नोटीस : पर्यायी व्यवस्थेची मागणी

The building of the Malawadi Talathi office is in progress | माळवाडी तलाठी कार्यालयाची इमारत मोडकळीस

माळवाडी तलाठी कार्यालयाची इमारत मोडकळीस

googlenewsNext
ठळक मुद्देसदर इमारत कार्यालय खाली करावी लागली तर साझा माळवाडीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही

माळवाडी : येथील तलाठी कार्यालयाची कौलारू इमारत मोडकळीस आली असून ग्रामपंचायत कार्यालयाने सदर धोकादायक इमारत खाली करण्याची नोटीस बजावली आहे.
माळवाडी येथे १९८० साली बांधण्यात आलेल्या कौलारू इमारतीत पूर्वी ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय होते. ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन इमारत बांधून मिळाल्याने या जागेत फक्त तलाठी कार्यालय कार्यरत आहे. परंतु आता या इमारतीच्या कौलांना तडे गेले असून छतही खराब झाल्याने असल्याने इमारत धोकादायक बनली आहे. धोकेदायक स्थितीत या इमारतीतून साझा माळवाडी अंतर्गत माळवाडी, फुलेमाळवाडी आणि सटवाईचीवाडी ह्या तीन गावांचे कामकाज चालते तसेच याठिंकाणी शेतीसंदर्भातील सर्व नोंदी, दस्तावेजच याच कार्यालयात आहेत. आता सदर इमारत कार्यालय खाली करावी लागली तर साझा माळवाडीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. महसूल विभाग व सामान्य प्रशासनामार्फत ग्रामीण भागातील शासकीय इमारत बांधकाम व दुरु स्तीवर लाखो रु पयांची तरतूद केली जाते. मात्र देवळा तालुक्यातील मालवाडीसह इतरत्र तलाठी कार्यालयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या जुन्या इमारतीच्या दुरु स्तीसाठी अथवा त्या जागेवर नवीन इमारत बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: The building of the Malawadi Talathi office is in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक