विवाहितेचा विनयभंग करून भावांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:36 AM2018-12-26T00:36:32+5:302018-12-26T00:36:51+5:30

कानाच्या उपचारासाठी आलेल्या परप्रांतिय विवाहितेचा विनयभंग करून तिला वाचविण्यासाठी आलेल्या भावांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास  पाथर्डी गावात घडली़

 The brothers beat up their marriage molestation | विवाहितेचा विनयभंग करून भावांना मारहाण

विवाहितेचा विनयभंग करून भावांना मारहाण

Next

नाशिक : कानाच्या उपचारासाठी आलेल्या परप्रांतिय विवाहितेचा विनयभंग करून तिला वाचविण्यासाठी आलेल्या भावांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास  पाथर्डी गावात घडली़ या प्रकरणी संशयित अशोक राजाराम  गायकर (रा. पाथर्डी) विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परप्रांतिय २८ वर्षीय विवाहिता पाथर्डी परिसरात राहणाऱ्या भावांकडे कानाच्या उपचारासाठी आली आहे़ सदर महिला रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भावांना भेटण्यासाठी जात असताना संशयित अशोक गायकर याने निकम मळा परिसरात अडवून तिचा विनयभंग केला़ यावेळी महिलेने आरडाओरड केल्याने वाचविण्यासाठी आलेल्या दोघा भावांना गायकर याने शिवीगाळ व मारहाण करून एकास दगडावर ढकलले़ यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर प्रथम खासगी व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले़ या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी संशयित गायकर यास अटक केली आहे़
पंचवटीत अज्ञात तरुणाचा मृतदेह
पंचवटीतील गणेशवाडी येथील आयुर्वेदिक दवाखान्यासमोर असलेल्या भाजी मार्केट परिसरात सोमवारी सायंकाळी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला़ साधारणत: ३० ते ३५ वयोगटातील तरुण असून, या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. या युवकाबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  The brothers beat up their marriage molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.