संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:11 PM2018-01-06T14:11:59+5:302018-01-06T14:14:06+5:30

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरु वारपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज यात्रेची येथे जय्यत तयारी सुरू असून यात्रा प्लास्टिक मुक्त निर्मळवारी यात्रा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी केले तर यात्रा शांततेचे व निर्विघ्न पार पाडण्यासाठी जनतेने व सर्व यंत्रणांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी तहसिल कार्यालयात आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत केले.

The birth anniversary of Saint Nivruttinath Maharaj Yatra | संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरु वारपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज यात्रेची येथे जय्यत तयारी सुरू असून यात्रा प्लास्टिक मुक्त निर्मळवारी यात्रा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी केले तर यात्रा शांततेचे व निर्विघ्न पार पाडण्यासाठी जनतेने व सर्व यंत्रणांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी तहसिल कार्यालयात आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत केले.
१२ जानेवारीला संत निवृत्तीनाथ महाराज यात्रे निमित्ताने लाखो भाविक श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याने होणाºया गर्दीचे नियोजन करून भाविकांना सुख सुविधा उपलब्ध करून देत यंदाची यात्रा प्लास्टिक मुक्त निर्मळ वारी यंदा यात्रा पर्यावरण पूरक करण्यासाठी येणार्या भाविका कडे असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जमा करून प्लास्टिक मुक्त यात्रा, निसर्गपूरक यात्रा करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी राहुल पाटील यांनी तहसील कार्यालयात आयोजित यात्रा नियोजन बैठकीत केले. या बैठकीस तहसीलदार महेंद्र पवार, उपविभागिय पोलीस अधिकारी शामराव वळवी, श्रीसंत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज धोंडगे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
भाविकांना नगरपालिकेने त्र्यंबक शहरात व वनविभागाने फेरी सुरु होणाºया वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यावर (फेरी मार्ग) कापडी किवा कागदी पिशव्या उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभी करण्याची सूचना करून प्लास्टिक मुक्त यात्रा करण्याच्या सूचना केल्या. संत निवृत्तीनाथांची यात्रा पर्वकालाच्या पाशर््वभूमीवर शासकीय पातळीवर नियोजनाचा आढावा घेतला.यावेळेपासुन संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा आपल्या सर्वांच्या सहभागाने निर्मल वारी म्हणुन पार पाठीत आहोत त्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करु न काम करण्याचे आवाहन केले. शहरात आलेल्या भाविकांना त्र्यंबक नगरपरिषदेतर्फे मुलभुत सुविधा देण्यासाठी पालिकेस सर्वच यंत्रणांनी सहकार्य करावे. आदी सूचनांचा समावेश आपल्या मनोगतात करु सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानुन शेवटी त्र्यंबकेश्वर मध्ये भरणार्यांना वर्षातील सर्वात मोठी असलेली संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा निर्मल वारी म्हणुन पार पाडण्यासाठी सर्वांना सहकार्याचे आवाहन केले.

Web Title: The birth anniversary of Saint Nivruttinath Maharaj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक