सटाण्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:41 PM2018-11-20T12:41:13+5:302018-11-20T12:41:53+5:30

सटाणा : शहरातील प्रक्रि या न करता वर्षानुवर्ष साठवलेल्या कचºयावर बायो-मायनिंग या शास्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करण्यास पालिकेला नगरविकास विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.या प्रकल्पासाठी ३ कोटी ९४ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

Biomointing Project for disposal of wastes in the hamlet | सटाण्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प

सटाण्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प

Next

सटाणा : शहरातील प्रक्रि या न करता वर्षानुवर्ष साठवलेल्या कचºयावर बायो-मायनिंग या शास्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करण्यास पालिकेला नगरविकास विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.या प्रकल्पासाठी ३ कोटी ९४ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगरविकास विभागाकडे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला होता.त्याला संबधित विभागाने मान्यताही दिली होती.मात्र धोरण निश्चित होईपर्यंत बायो-मायनिंगचा खर्च न करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने यापूर्वी दिल्या होत्या.राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरामध्ये हागणदारीमुक्त व स्वच्छतेबाबत कार्यवाही सुरु आहे.त्यात सटाणा पालिकेचा समावेश असून घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तीन कोटी ९४ लाख रु पयांच्या प्रकल्प अहवालास मंजुरी दिली आहे.आता या प्रकल्प अहवाल मंजूर झाल्यानंतर शासनाने साठवून ठेवलेला कचºयावर बायो-मायनिंग प्रक्रि या राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे.या प्रक्रि येचा अभ्यास करून त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी संबधित प्रकल्प पथदर्शी स्वरु पात राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे. या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सहा नवीन घंटागाड्यांना मान्यता ,कचरा संकलन व विलगीकरण करणे ,कचरा डेपोस कंपाऊंड करण्यास मान्यता ,लोकांमध्ये जनजागृती करणे ,प्रकल्प व यंत्रसामग्री घेणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Biomointing Project for disposal of wastes in the hamlet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक