सफाई कामगारांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:53 AM2018-12-05T00:53:44+5:302018-12-05T00:58:03+5:30

त्र्यंबकेश्वर : तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सफाई कामगारांपैकी तिघांची तब्येत खालावल्याने नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले. काढून टाकलेल्या १५ पैकी १० कामगारांना त्वरित तर उर्वरित पाच कामगारांना निवृत्तिनाथ यात्रेत कामावर घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे कामगारांनी उपोषण मागे घेतले.

Behind the fasting of cleaning workers | सफाई कामगारांचे उपोषण मागे

उपोषण सोडल्यानंतर उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले. समवेत नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, श्यामराव गंगापुत्र, सागर उजे, त्रिवेणी सोनवणे, रवींद्र सोनवणे आदी.

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : सर्वांना कामावर घेण्याचे आश्वासन

त्र्यंबकेश्वर : तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सफाई कामगारांपैकी तिघांची तब्येत खालावल्याने नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले. काढून टाकलेल्या १५ पैकी १० कामगारांना त्वरित तर उर्वरित पाच कामगारांना निवृत्तिनाथ यात्रेत कामावर घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे कामगारांनी उपोषण मागे घेतले.
त्र्यंबक नगर परिषदेच्या १५ सफाई कामगारांना एकाएकी कामावरून घरी पाठविले. यामुळे या कामगारांची उपासमार झाली. दोन महिने वाट पाहूनही कामावर घेण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने कामावरून काढलेल्या १५ सफाई कामगारांनी रविवारपासून त्र्यंबक नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. मंगळवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. उपोषणास बसलेल्या मीना कदम, नानासाहेब दोंदे, लक्ष्मण फुलमाळी, मंगेश दोंदे आदींची तब्येत खालावल्याने त्यांना उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार म्हणाले, सफाई कामगारांना हँडग्लोव्हज, मास्क वगैरे साहित्य दिले जाईल ते प्रत्येकाने वापरणे अनिवार्य आहे. याशिवाय कामाची वेळ सकाळी ७ ते १ व दुपारी २ ते ५ अशी राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक सागर उजे, सायली शिखरे, हर्षल शिखरे, कल्पना लहांगे, अशोक लहांगे, नितीन रामायणे, उमेश सोनवणे , नाना दोंदे, रमेश दोंदे, रवींद्र गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, महेश कदम आदी उपस्थित होते. पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर, आरोग्य सभापती विष्णू दोबाडे, त्रिवेणी तुंगार आदींच्या उपस्थितीत बैठक होऊन १० सफाई कामगार आता तर उर्वरित पाच कामगारांना निवृत्तिनाथ यात्रेत कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांना निर्णय मान्य झाल्याने रु ग्णालयात दाखल केलेल्या नानासाहेब दोंदे यांच्या संमतीनंतर उपोषण सुटले.

Web Title: Behind the fasting of cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.