दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महासभेत ‘पाकिस्तान’ मुर्दाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:35 AM2019-02-21T01:35:49+5:302019-02-21T01:36:05+5:30

काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला.

 In the backdrop of terrorist attacks, 'Pakistan' Mudadabad in the General Assembly | दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महासभेत ‘पाकिस्तान’ मुर्दाबाद

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महासभेत ‘पाकिस्तान’ मुर्दाबाद

Next

नाशिक : काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे महासभेचे कामकाज चालविण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी भाजपाला महासभा तहकूब करावी लागली. दरम्यान, महासभेपूर्वीदेखील पाकिस्तानच्या प्रतीकात्मक ध्वजाची होळी भाजपाच्या काही नगरसेवकांनी केली.
महापालिकेची तहकूब झालेली ही महासभा आता शुक्रवारी (दि. २२) होणार आहे. महापालिकेची मासिक महासभा बुधवारी (दि. २२) सकाळी आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या महासभेने सर्वप्रकारची करवाढ रद्द करण्याचा ठराव करूनही आयुक्त त्याची अंमलबजावणी करीत नसल्याने शिवसेनेसह विरोधी पक्षांनी त्यावर लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर घणाघाती चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र ती चर्चा टळली आहे. महापालिकेची महासभा बुधवारी (दि. २०) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वी मुकेश शहाणे यांच्यासह काही नगरसेवकांनी पाकिस्तानचा निषेध करीत सभागृहाबाहेर पाकिस्तानचा प्रतीकात्मक झेंडा जाळला. त्यानंतर सभागृहात कामकाज सुरू झाल्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाचे वाचन करण्यात आले आणि त्यानंतर महापौरांनी नियमित कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यांना शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांनी साथ दिली. भाजपाचे नगरसेवक यात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी यावेळी दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांचे प्राण गेले. देशपातळीवर शोक व्यक्त केला जात असताना महासभा घेणे संयुक्तीत होणार नाही, असे सांगत सभा तहकुबीची मागणी केली. मुशीर सय्यद यांनीदेखील ही सभा तहकूब करावी, असे सांगितले.
लक्षवेधीबाबत चर्चाच नाही...
महापालिकेची महासभा घोषणाबाजीनंतर तहकूब करण्यात आली असली तरी ती सुरू असताना विरोधकांनी लक्षवेधी दाखल करून घ्या, अशी सूचनाही न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महासभेत जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्यातदेखील सभा तहकुबीची सूचना नव्हती, असे भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी यावेळी दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांचे प्राण गेले. देशपातळीवर शोक व्यक्त केला जात असताना महासभा घेणे संयुक्तीत होणार नाही, असे सांगत सभा तहकुबीची मागणी केली.

Web Title:  In the backdrop of terrorist attacks, 'Pakistan' Mudadabad in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.