आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र :  जयंत देवपुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:56 AM2018-10-30T00:56:11+5:302018-10-30T00:57:12+5:30

आयुर्वेद शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यातील दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये जिज्ञासा आत्मविश्वास आणि अनुमान अध्यापकांनी वाढविणे गरजेचे आहे. आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र असून, देशाचे खºया अर्थाने सामर्थ्य आणि शक्ती असल्याचे प्रतिपादन केंद्रीय चिकित्सा परिषदेचे नवी दिल्ली नूतन अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी केले.

 Ayurveda is a society oriented science: Jayant Devpujari | आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र :  जयंत देवपुजारी

आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र :  जयंत देवपुजारी

googlenewsNext

पंचवटी : आयुर्वेद शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यातील दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये जिज्ञासा आत्मविश्वास आणि अनुमान अध्यापकांनी वाढविणे गरजेचे आहे. आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र असून, देशाचे खºया अर्थाने सामर्थ्य आणि शक्ती असल्याचे प्रतिपादन केंद्रीय चिकित्सा परिषदेचे नवी दिल्ली नूतन अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी केले.  आयुर्वेद सेवा संघ व सुकाणू समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, आमदार डॉ. राहुल अहेर, स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी अहेर, सीसीआयएम महाराष्ट्र फेडरेशनचे चेअरमन डॉ. बाळासाहेब अहेर, सचिव निशिकांत पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे देशमुख, आशुतोष गुप्ता, डॉ संदीप पाटील जेम्स स्कूलचे संचालक अभिजित आडके उपस्थित होते.
वैद्य देवपुजारी यांनी अध्यक्षपदाचा कारभार घेतल्यानंतर दिल्ली कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून महाराष्टाचा झेंडा अटकेपार लावला आहे. आयुर्वेद क्षेत्रातील प्रश्नांची गांभीर्याने सोडवणूक करतील, अशा विश्वास सचिव निशिकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद आवारे यांनी प्रास्ताविक केले. सोहळ्यासाठी आयुर्वेद सुकाणू समिती पदाधिकारी, आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
१९ वर्षांनंतर महाराष्टला अध्यक्षपद
आयुर्वेद चिकित्सा परिषद (सिसीआयम) स्थापना १९७१ साली झाली, तेव्हापासून अनेक अध्यक्ष परिषदेवर निवडून गेले परंतु तब्बल १९ वर्षांनंतर महाराष्ट्रीयन व्यक्तीला दिल्लीचे तख्त मिळवण्यात यश मिळाले. मराठी व्यक्ती परिषदेवर अध्यक्ष म्हणून विराजमान झाली याचा सार्थ अभिमान असल्याचे मत सिसीआयएम महाराष्ट्र फेडरेशनचे चेअरमन डॉ. बाळासाहेब अहेर यांनी केले.

Web Title:  Ayurveda is a society oriented science: Jayant Devpujari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.